पिंपरीत गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट, पोलिसांनी केले बारा वाजता सर्व बंद

    पिंपरी : यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणूकीत ‘डीजे’चा (ध्वनिक्षेपक) दणदणाट पाहायला मिळाला. सर्वच ठिकाणी मोठ्याआवाजात ‘डीजे’ सुरु होते. मुख्य विसर्जन मार्गावर पोलिसांनी बारा वाजता डीजे बंद केले. त्यानंतर गणेशोत्सव मंडळांनी शांततेतविसर्जन मिरवणूका पुढे नेल्या. मात्र डीजे मुळे नाहक त्रास झाला.

    मोठ्या प्रमाणावर डीजेचा दणदणाट

    पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकात यंदा मोठ्या प्रमाणावर डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. ग्रामीण भागात तरमयत झालेल्या घरासमोर डीजे वाजवू नका म्हटले म्हणून टोळक्याने कुटुंबाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी डीजेमुळे लहान मुले आणि वयोवृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागला. हिंजवडी येथे तर डीजेच्या समोर नाचताना तरुणाचा मृत्यूझाल्याची चर्चा होती मात्र पोलिसांनी त्यास नकार दिला.

    डीजेच्या तालावर मिरवणुका काढल्या

    जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (दि. 28) ध्वनिक्षेपक वापरण्यास रात्री बारा वाजेपर्यंत परवानगीदिली होती. गणेशोत्सव मंडळांकडून देखील रात्री बारापर्यंत डीजेच्या तालावर मिरवणुका काढल्या गेल्या. मात्र बारा वाजताचपोलिसांनी डीजेचा आवाज बंद केला.

    डीजेचा आवाज बंद झाल्यानंतर गणेशोत्सव मंडळांनी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणादेत मिरवणुका पुढे नेल्या. त्यानंतर मंडळांनी शांततेत विसर्जन पार पाडले.

    डीजे जप्त करण्याचे धाडस नाही …

    मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याने अनेक त्रास होतात. तसेच आवाजाची मर्यादाही ठरलेली आहे. मात्र त्याचे सर्रास उल्लंघन होतानादिसले. याकडे प्रशासनाने डोळेझाक केली. पाठीमागे एकदा मिरवणुकीच्या अगोदरच डीजे जप्त केले होते. यावेळी असेहीकाही होताना दिसले
    नाही.