sanjay raut

हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर एकतरी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला दिले. ते प्रसारमध्यामांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या पाचपैकी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपचा विजय झाला. तर तेलंगणाची निवडणूक काँग्रेसने जिंकली.

    मुंबई : हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर एकतरी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला दिले. ते प्रसारमध्यामांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या पाचपैकी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपचा विजय झाला. तर तेलंगणाची निवडणूक काँग्रेसने जिंकली. या निकालावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देत असताना राऊत यांनी ईव्हीएम मशीनवर वारंवार शंका उपस्थित केली. यावर संजय राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले.

    संजय राऊत म्हणाले, ‘नरेंद्र मोदी आहेत म्हणून भाजप आहे, भाजपचे अस्तित्व आहे. तरी देखील महात्मा गांधी, पंडीत नेहरू यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षित नसले तरी तांडव न करता जनमत स्वीकारावे लागेल. मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी ईव्हीएमबद्दल इंडिया आघाडीचं मुंबईतील बैठकीत संशय व्यक्त केला होता.

    देशातील सामान्य लोकांच्या मनात अशी शंका असेल तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. आम्ही परत सांगतो एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. भाजप जिंकल्यामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे नेते ईव्हीएमला दोष देतील, असे फडणवीस म्हणाले होते. या मुद्द्यावर संजय राऊत यांनी फडणवीस यांना सवाल केला.