
मालेगावच्या सभेत खोके, मिंधे या शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर टीका केली होती. त्याविरोधात शिंदे गट आक्रमक झाला आहे. आमदार संजयशिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. खंडोजी खोपडे कुणाला म्हणता, वेळ आल्यानंतर आन्ही सर्वांना दाखवून देऊ, गद्दारी कुणी केली आणि खोके कुणी घेतले.
मुंबई – मालेगावमध्ये (Malegaon) रविवारी झालेल्या उद्धव ठाकरेंच्या (uddhav thackeray) सभेत एक कांदा किती खोक्यांना विकला गेला, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सुहास कांदेंना (Suhas Kande) लक्ष्य केलं होतं. त्यावर सुहास कांदेंनी लागलीच प्रत्युत्तर दिलंय. आपली नार्को टेस्ट करा आणि आपण काही नावं देतो कंत्राटदार आणि कंपन्यांची, त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी किती खोके घेतलेत, हे स्पष्ट करा, असं आव्हानच त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. या प्रकरणात उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट् करा, अशी मागणीही त्यांनी केलीय. जर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सापडलो तर राजकारणआतून निवृत्ती घेऊ, असं आव्हानही कांदेंनी दिलंय. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यामुळे दिल्याचंही कांडे म्हणाले आहेत. मालेगावच्या सभेत खोके, मिंधे या शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर टीका केली होती. त्याविरोधात शिंदे गट आक्रमक झाला आहे. आमदार संजयशिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. खंडोजी खोपडे कुणाला म्हणता, वेळ आल्यानंतर आन्ही सर्वांना दाखवून देऊ, गद्दारी कुणी केली आणि खोके कुणी घेतले. कसे घेतले हे दाखवून देऊ असं प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिलंय.
काय म्हणाले संजय राऊत…
उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, या आव्हानावर संजय राऊतांनी उत्तर दिलंय. कोण बोलतंय हे , ज्या कांद्याला ५०-५० कोटींचा भाव घेतला आणि शेतकरी बिचारा कांद्यासाठी रडतोय. ते असा आरोप करतायेत अशी टीका राऊतांनी केली. कालच्या मालेगावच्या सभेनं कोणाची नार्को टेस्ट जनता भविष्यात करणार आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. असंही ते म्हणाले. फालतू लोकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही. असं राऊतांनी सांगितलंय.
सभेत काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की हा हा पट्टा आहे, तो कांद्याचा पट्टा आहे. कांद्याला भाव मिळाला नाही, असं का म्हणता. मी म्हणतो कांद्याला भाव मिळाला. गेल्या वर्षी एक कांदा खरेदी नाही का झाला. जर एक कांदा किती खोक्यांना जात असेल तर तुम्हाला किती खोके, तुमच्या घामाला पैसे मिळाले पाहिजेत. यावेळी त्यांनी शिंदे गटावर गद्दार असल्याची टीका केली होती. गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही. हे गद्दार म्हणजे खंडोजी खोपडेंचची अवलाद असल्याची टीका त्यांवनी केली होती. या ढेकणांचा पराभव करण्यासाठी तोफेची गरज नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सुनावलं होतं.