हॉटेल व्यावसायिकांनो, बाटलीबंद पाण्याची सक्ती करू नका, अन्यथा होईल कारवाई !

कुठल्याही हॉटेमध्ये बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येत नाही. अशी सक्ती कोणी केल्यास अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रार करता येते. नागरिकांनी याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत हॉटेल्समध्ये जेवण किंवा नाश्ता करायला जाण्याचा प्रकार वाढला आहे.

    हिंगोली : कुठल्याही हॉटेमध्ये बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येत नाही. अशी सक्ती कोणी केल्यास अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रार करता येते. नागरिकांनी याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत हॉटेल्समध्ये जेवण किंवा नाश्ता करायला जाण्याचा प्रकार वाढला आहे. वाढदिवस, मॅरेज अॅनिव्हर्सरी यासह इतरही कार्यक्रम थेट हॉटेलांमध्ये साजरे करून तिथेच नातलगांना भोजन देण्याचा बेत अनेकांकडून आखला जातो. यामुळे हॉटेलांमधील गर्दी वाढली असून, जेवणाच्या टेबांवर थेट बाटलीबंद पाणी ठेवून हॉटेल्स चालक हात झटकत आहेत.

    वास्तविक पाहता बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येत नाही. ग्राहक अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रार करू शकतात. बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येत नाही. बाटलीबंद पाणी घेणे किंवा नाकारणे, हा विषयच आता राहिलेला नाही. बहुतांश हॉटेल व्याससायिक बाटलीबंद पाणीच ग्राहकाच्या माथी मारण्याचा धूर्तपणा करताना दिसत आहे. मात्र, बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येत नाही.

    …तर एफडीएकडे करा तक्रार

    नियमांचे उल्लंघन करून हॉटेल व्यावसायिक बाटलीबंद पाणीच घ्यावे लागणर, अशी सक्ती करत असेल तर ग्राहकांनी एफडीएकडे संबंधिताची तक्रार करायला हवी. एफडीएकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित हॉटेलची तपासणी केली जाईल, असे सांगण्यात आले.