अजित पवारांनी भर सभेतच म्हटलं, ‘रामदेवबाबाच्या नादी लागू नका, पण…’

महाराष्ट्रात अनेक साधू-संतांना (Sadhu Sant) मानणारा मोठा वर्ग आहे. साधू-संतांच्या विचारांवर चालणारी माणसे अजूनही आपल्याला दिसतात. तसाच मोठा वर्ग योगगुरु रामदेवबाबा (Ramdev Baba) यांना मानणारा देखील आहे.

    कर्जत : महाराष्ट्रात अनेक साधू-संतांना (Sadhu Sant) मानणारा मोठा वर्ग आहे. साधू-संतांच्या विचारांवर चालणारी माणसे अजूनही आपल्याला दिसतात. तसाच मोठा वर्ग योगगुरु रामदेवबाबा (Ramdev Baba) यांना मानणारा देखील आहे. पण आता याच रामदेवबाबा यांच्याबाबत मिश्किलपणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले. ‘रामदेवबाबाच्या नादी लागू नका’, असे जाहीरसभेत अजित पवार यांनी विधान केले आहे.

    अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या रोहित पवारांच्या मतदारसंघात अंबालिका कारखान्यावर शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी रामदेवबाबा यांच्याबाबत विधान केले. ते म्हणाले, ‘माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही सगळे नखाला नखं घासता का, अशी नखावर नखं घासली की, डोक्यावर केसावर केसं येतात. पण केसं यायचं तर बाजूला राहिलं, काही खरं नाही, असं म्हणत अजित पवारांनी आपल्या डोक्यावर केसं नाही, असं दाखवण्यासाठी डोकच पुढे केलं होतं.

    साधू-संतांचं, महापुरुषांचं ऐका पण…

    साधू संतांचे ऐका. पण बुवाबाजीच्या मागे लागू नका. माझ्या डोक्यावरच केस गेले आहे. रामदेवबाबाने सांगितलं म्हणून तुम्ही नखावर नख घासतात का? तसं करू नका डोक्यावर केस यायचे तर सगळे केस गेले. बुवा लोकांचं काही ऐकू नका, साधू संतांचे ऐका, महापुरुषांचा ऐका. अहिल्याबाई होळकर यांचं ऐका, शाहू-फुले-आंबेडकर असतील. मौलाना आझाद असतील त्यांचं ऐका. या सगळ्या महान व्यक्तींचं ऐका, पण, बुवाबाजीचं काही ऐकू नका, असेही अजित पवार यांनी सांगितले.