जुन्या पेन्शनसाठी सहनशक्तीचा अंत पाहू नका; आमदार प्रणिती शिंदे आक्रमक

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. जुनी पेन्शन (Old Pension Scheme) तात्काळ लागू करा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी केले.

सोलापूर : शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. जुनी पेन्शन (Old Pension Scheme) तात्काळ लागू करा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी केले. तसेच या शासनाला जाग आणण्यासाठी लाखो शासकीय कर्मचारी रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

सोलापूर शहरात आज जुनी पेन्शन लागू करण्यासाठी डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज गेट जिल्हा परिषद सोलापूर पर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. २५ हजारपेक्षा अधिक शासकीय कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. जुनी पेन्शन लागू करा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करा. वेतन त्रुटी दूर करा, अशा मागण्यांनी आज सोलापूर शहरातील मार्ग दुमदुमले होते.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू झालेला मोर्चा डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज गेट जिल्हा परिषद सोलापूरपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शतनू गायकवाड, अशोक इंदापुरे यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघांचे अध्यक्ष राजेश देशपांडे, राम शिंदे, अमृत कोकाटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या मोर्चात जिल्ह्यातील 11 तालुके तसेच सोलापूर शहरातील कर्मचारी सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. अनेक वेषभूषा करून कर्मचारी जुनी पेन्शनची मागणीसाठी लक्षवेधी घेत होती. पायी चालत निघालेला या मोर्चाने शहरात एकेरी वाहतूक करण्यात आली होती.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका : आमदार शिंदे

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. जुनी पेन्शन तात्काळ लागू करा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. या शासनाला जाग आणण्यासाठी लाखो शासकीय कर्मचारी रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत. अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका सहित जुनी पेन्शन योजना लागू करा, असेही त्यांनी म्हटले.