ललित पाटीलप्रकरणी मंत्री दादा भुसेंचे खुले आव्हान, म्हणाले, हवी ती टेस्ट करा, पण जर………..

    Sassoon drugs case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलवरून राज्यात राजकारण पेटले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई यांच्यावर आरोप करीत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
    राजकीय नेते सहभागी
    ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसोबत दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची देखील नार्को टेस्ट करा. याचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवा, अशी मागणी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी केली आहे. या नेत्यासोबतच ससून रुग्णालयाच्या डीनची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपावर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
    त्यानंतर लाईव्ह चर्चा
    यावर बोलताना भुसे म्हणाले, गेल्या वेळी अंधारे यांनी ही मागणी केली. त्यानंतर लाईव्ह चर्चा झाली, त्यानंतर मी म्हणालो होतो. चौकशीसाठी, कसल्याही टेस्ट करण्यासाठी. मी तयार आहे, मी अशा आरोपांनी मी भिक घालत नाही, असं दादा भुसे म्हणालेत.
    सर्व माहिती चौकशीमधून बाहेर येईल
    तर ललित पाटील म्हणाला मी पळून गेलो नाही मला पळवलं गेलं, यामध्ये सहभागी असलेल्या नेत्यांची नावे मी जाहीर करीन यावर बोलताना भुसे म्हणाले की, ही सर्व माहिती चौकशीमधून बाहेर येईल. माझी हवी तर चौकशी करा, पण जे कोणी आरोप करत आहे त्याची देखील चौकशी करावी, माझ्यासोबत त्यांची देखील नार्को टेस्ट करावी’, असंही दादा भुसे म्हणाले आहेत.
    केवळ प्रसिध्दी मिळवण्यासाठी आरोप करायचे
    तर माझा अशा काही प्रकरणात माझा संबध आला तर माझं पद आणि राजकारण देखील सोडायला मी तयार आहे. केवळ प्रसिध्दी मिळवण्यासाठी आरोप करायचे हे बरोबर नाही. यांच्या बोलवण्यामागे कोण बोलवता धनी आहे त्यांचीही नार्को टेस्ट करावी असंही दादा भुसे म्हणाले आहेत. तर त्या मोठ्या नेत्या आहेत, मी फार लहान शिवसैनिक आहे. त्याच्यांशी तुलना होऊ शकत नाही, असंही पुढे दादा भुसे म्हणाले आहेत.
    मी त्यांना याआधी सांगितलं आहे, कोणत्या यंत्राने माझी चौकशी करा असंही म्हणालो आहे, तरीही त्यांनी प्रसिध्दी मिळवण्यासाठी वारंवारं त्या बोलत असाव्या असंही भुसे म्हणाले आहेत.
    अंधारेंमुळे माझी प्रतिमा मलिन, नोटीस पाठवणार – शंभुराज देसाई
    ललित पाटीलला मी ओळखत नाही. कारण नसताना माझे नाव घेतले जात असून सुषमा अंधारेंना नोटीस नोटीस पाठवणार असल्याची माहिती शंभुराज देसाई यांनी दिली आहे. तर सुषमा अंधारेंचे वक्तव्य हास्यास्पद आहे. लवकरच मी त्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहे. ललित पाटील प्रकरणात माझा थोडा संबंध जरी सापडला तरी मी राजकारण सोडेल असंही देसाई म्हणाले आहेत.