दरवाढीचा, महागाईचा ‘राक्षस’ ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ याला मोदी सरकारची मुत्सद्देगिरी म्हणायचे काय? इंधन दरवाढीवर सामनातून मोदींवर टिका

‘गरज सरो, वैद्य मरो’ असं धोरण केंद्रानं अवलंबल्याचं म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्राच्या धोरणावर व मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. निवडणुका संपल्या, जनतेची गरज संपली. तेव्हा कालपर्यंत बाटलीत बंद करून ठेवलेला इंधन दरवाढीचा ‘राक्षस’ आता बाहेर काढला, यालाच मोदी सरकारची मुत्सद्देगिरी म्हणायचे काय?

    मुंबई : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, या निवडणुका संपल्यानंतर इंधनाचे दर वाढतील असा कयास लावला जायचा. तो कयास अखेर खरा ठरला आहे. ‘गरज सरो, वैद्य मरो’ असं धोरण केंद्रानं अवलंबल्याचं म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्राच्या धोरणावर व मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. निवडणुका संपल्या, जनतेची गरज संपली. तेव्हा कालपर्यंत बाटलीत बंद करून ठेवलेला इंधन दरवाढीचा ‘राक्षस’ आता बाहेर काढला, यालाच मोदी सरकारची मुत्सद्देगिरी म्हणायचे काय? पाच राज्यांच्या निवडणूक काळात बंद केले गेलेले जनतेचे कान आणि डोळे आता कदाचित खाडकन उघडले असतीलही, पण त्याचा आता काय उपयोग? ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणेच केंद्रातील विद्यमान राज्यकर्ते धोरण राबवीत आहेत. निवडणुका संपल्याने मतदार असलेल्या जनतेची गरजही तूर्त उरलेली नाही. म्हणूनच इंधन दरवाढीचे तेल आधीच भडकलेल्या महागाईच्या वणव्यात ओतण्यात आले आहे. अशी बोचरी टिका केंद्र सरकारवर सामनातून करण्यात आली आहे.

    दरम्यान, ज्याची भीती होती तसेच झाले, केंद्र सरकार ५ राज्यातील निवडणुकांची वाट बघत होती, हे उदाहरण देत ‘गरज सरो, वैद्य मरो’ असं म्हणून इंधन दरवाढीचे तेल महागाईच्या वणव्यात ओतल्याचं म्हणत घणाघाती टीका आजच्या सामनातून केंद्र सरकारवर केली आहे. याला मोदींचे व मोदी सरकारची मुत्सद्देगिरी म्हणायचे काय? असा संतप्त सवाल सुद्धा सामनातून उपस्थित केला आहे. तसेच निवडणुका संपल्याने मतदार असलेल्या जनतेची गरजही तूर्त उरलेली नाही. म्हणूनच इंधन दरवाढीचे तेल आधीच भडकलेल्या महागाईच्या वणव्यात ओतण्यात आले आहे. असा निशाणा मोदीवर साधण्यात आला आहे.

    केंद्र सरकार फक्त देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत दरवाढीची वाट बघत होते. तसेच स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ केंद्र सरकार रोखून धरेल आणि निकाल लागले की, या दरवाढीचा बुलडोझर सामान्य जनतेवर बिनदिक्कतपणे फिरविला जाईल, अशी भीती व्यक्त होत होतीच. ती अखेर खरी ठरली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या घरगुती गॅसचे सिलिंडर थेट 50 रुपयांनी महाग करण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे पेट्रोल पुन्हा शंभरीच्या पुढे, तर घरगुती गॅस सिलिंडर एक हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी तर तब्बल दोन हजार रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळं सामान्य जनतेनं जगयाचे कसे? असा सवाल सामनातून करत मोदी सरकारच्या धोरणावर टिकास्त्र सोडले आहे.