तुमचा दाभोळकर करू…; अंनिसच्या श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा…

बागेश्वर बाबांनी आपले दावे आमच्यासमोर सिद्ध केल्यास त्यांना 30 लाखाचे बक्षीस दिले जाईल, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दिले आहे. त्यानंतर त्यांना आमच्यसमोर असा चमत्कार काराव असं आव्हान अंधश्रद्धा निर्मूलनकडून देण्यात आलं होतं.

  मुंबई- राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Annis) अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांना जीवे मारण्याची धमकी (threat) देण्यात आली आहे. तुमचा दाभोळकर करु, अशा प्रकारची धमकी श्याम मानव यांना देण्यात आली आहे. त्यामुळं खळबळ माजली असून, श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून बागेश्वर बाबा आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांच्यात वाद सुरु आहे. बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या चमत्काराच्या दाव्याने देशभरात वाद निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न श्याम मानव करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

  हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न…

  दरम्यान, या वादात आता महाराष्ट्रातील साधू-संतांनी उडी घेतली आहे. बागेश्वर बाबांनी आपले दावे आमच्यासमोर सिद्ध केल्यास त्यांना 30 लाखाचे बक्षीस दिले जाईल, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दिले आहे. त्यानंतर त्यांना आमच्यसमोर असा चमत्कार काराव असं आव्हान अंधश्रद्धा निर्मूलनकडून देण्यात आलं होतं. तसेच धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल करण्यासाठी नागपुरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याच्या कार्यक्रमात काही तरुणांनी गोंधळ घातला व त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अंनिसकडून आजच्या सभेच्या माध्यमातून त्यांनी कुठेही धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल केली नाही. आजच्या सभेत त्यांनी फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप काही तरुणांनी करत श्याम मानव यांची सभा संपताच उभे राहून गोंधळ घातला.

  अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करावा…

  महाराष्ट्रातून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करावा, अशीही मागणी महंत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे. मंहत अनिकेत शास्त्री म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा राज्यात लागू व्हावा, यासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी कठोर प्रयत्न केले. मात्र, आज नरेंद्र दाभोळकर यांचा उद्देश आणि त्यांच्या अनुयायींचा उद्देश याच्यामध्ये फार मोठी तफावत दिसत आहे. या मागणीसाठी नाशिक येथील रामकुंडावर साधू, संत आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

  वादानंतर धमकी…

  दरम्यान, मागील काही दिवसांपासून बागेश्वर बाबा तथा धीरेंद्र कृष्ण महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांच्यात वाद सुरु आहे. बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या चमत्काराच्या दाव्याने देशभरात वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर त्यांना आमच्यासमोर चमत्कार करण्याचे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलने दिले आहे, त्यानंतर आज श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.