अच्छा यामुळे होते का ट्राफिक? गंदा है पर धंदा है ये, वाहतूक पोलिसांची ट्रॅफिक वार्डनच्या माध्यमातून वसूली सुरु

    कल्याण : मुंब्रा बायपास कल्याण व शीळफाटा या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडी संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी काही व्हिडिओ ट्विट केले आहेत. त्यामध्ये ट्रॅफिक वॉर्डन हे अवजड वाहन चालकांकडून पैसे घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्रॅफिक पोलिस आणि ट्रॅफिक वॉर्डन यांच्या संगनमताने काही धंदे सुरु आहे. म्हणजे खुले आम भ्रष्टाचार सुरु असल्याचा हल्लाबोल मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. हा व्हिडिओ ठाणे, नवी मुंबई पोलिसांसह उपमुख्यमंत्र्यांना ट्वीट करीत ही पैसे वसूली त्वरीत थांबविण्याची मागणी केली आहे.

    मुंब्रा बायपास कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री आणि खासदार यांना लक्ष्य केले होते. आत्ता राजू पाटील यांनी काही व्हिडिओ ट्वीट केले आहेत. या व्हिडिओत ट्राफिक वॉर्डन अवजड वाहन चालकांकडून पैसे घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे या आम्ही या व्हिडिओची पुष्टी करीत नाही. परंतू मनसे आमदार राजू पाटील यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये अवजड वाहन चालकांकडून पैसे घेत असल्याच्या आरोप केला जात आहे वाहतूक कोंडीसाठी जबाबदार अवजड वाहन चालकांकडून पैसे ठरलेल्या कालावधी आधी पैसे घेऊन त्यांना प्रवेश दिला जात आहे. या अवजड वाहनांमुळे कल्याण शीळ, मुंब्रा बायपासवर ट्राफिक जाम होते. पावतीच्या नावाखाली ही वसुली केली जात आहे का असावा लोक उपस्थित केला जात आहे ट्राफिक कोटी साठी मुख्य कारण आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट केले आहे की, ज्यामध्ये त्यांचे म्हणणे आहे की, मुंब्रा बायपास कल्याण व शीळ फाटा येथे ट्रॅफिक वार्डनसह वाहतूक पोलिसांच्या संगनमताने जे काही धंदे सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन लाेकांना अनेक तास वाहतूकीत अडकून राहावे लागते. तसेच अवजड वाहनांच्या प्रवेशाची वेळ काटेकोरपणे पाळले जात नाही. हे सर्व धंदे बंद होतील अशी अशा करतो.

    आत्ता हा व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांकडून संबंधित ट्राफिक वॉर्डन पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाते. हे पाहणावे लागणार आहे.