zomato boy dog bite

खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा (Dog Bites Zomato Delivery Boys Private Part) प्रायव्हेट पार्ट पाळीव कुत्र्याने चावल्याचा भयानक व्हिडिओ समोर आला आहे.

    पनवेल : इंडियाबुल्सच्या सोसायटीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पनवेलमध्ये(Panvel News) इंडियाबुल्सच्या सोसायटीमध्ये (Indiabulls Society) खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा (Dog Bites Zomato Delivery Boys Private Part) प्रायव्हेट पार्ट पाळीव कुत्र्याने चावल्याचा भयानक व्हिडिओ समोर आला आहे.

    झोमॅटो किंवा अन्य कोणत्याही कंपनीचे डिलिव्हरी बॉय हे जोखमीचे काम करत असतात. त्यांना अपघात किंवा अन्य दुर्घटनांना सामोरे जावे लागते. डिलिव्हरी देऊन डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर पडत असताना कुत्र्याचा मालक लिफ्टमध्ये येत होता. हा कुत्रा जर्मन शेफर्ड जातीचा होता. डिलिव्हरी बॉय बाहेर पडत असताना मालकाने कुत्र्याला मागे ओढले. कुत्रा आत येत असल्याचे पाहून तो मागेही झाला. डिलिव्हरी बॉय बाहेर जाऊ लागला, याचवेळी कुत्र्याने उडी घेत तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला.

    या हल्ल्यामुळे डिलिव्हरी बॉय रक्तबंबाळ झाला. वेदनेने विव्हळत होता. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने त्याला डि. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याला अँटी रेबीज इंजेक्शन देण्यात आले आहे. तसेच प्रायव्हेट पार्टवर जिथे जखमा झाल्या आहेत, त्याला टाके घालण्यात आले आहेत.

    छोट्या बहीणीचा वाढदिवस होता…
    या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयच्या छोट्या बहीणीचा त्याच दिवशी वाढदिवस होता. यामुळे त्याला सुट्टी घेण्यास सांगितले होते. मात्र, विकेंडला जादा काम मिळते म्हणून तो कामाला गेला होता. त्या दिवसाची ती पहिलीच डिलिव्हरी होती, असे या तरुणाने सांगितले.