डोंबिवलीत शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, लोकांना विकासाचं राजकारण आवडतं – खासदार डॉ श्रीकांत शिंदे

बुधवारी डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसेना मध्यवर्ती शाखेत जनता दरबार होता. जवळपास चार तास खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेत होते.

    डोंबिवली : दर दिवस सकाळी उठून टिपणी करायची, दर दिवस उठून शिव्या श्राप देणे टीका करणे हे राजकारण सुरू आहे. या राजकारणाला कंटाळून लोकांनी विकासाचा राजकारणाला प्राधान्य दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात विकास होतोय, असे विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत केले. डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

    बुधवारी डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसेना मध्यवर्ती शाखेत जनता दरबार होता. जवळपास चार तास खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेत होते. अनेक समस्यांचे निवारण देखील करण्यात आलं. यावेळी ठाणे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्या पुढाकाराने डोंबिवलीतील शेकडो तरुणांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, दर दिवस सकाळी उठून टीकाटिपणी केली जाते, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात विकासाचे काम सुरू आहेत असं बोलत अप्रत्यक्षरीत्या उद्धव ठाकरेंना लक्ष केलं.

    पुढे बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दर दिवस उठून जे शिव्या श्राप देणे, टीका करणे, हे जे राजकारण सुरू आहे त्याला कंटाळून लोकांनी विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिलय. विकासाचे राजकारण पाहून विविध पक्षातले कार्यकर्ते तरुण-तरुणी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगत विरोधकांना टोला लगावला यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.