रमी सर्कलवर गेम खेळून झाला कर्जबाजारी, कर्ज फेडण्यासाठी केली चोरी, मात्र धाडसी तरुणाने पकडले चोरट्याला

विष्णू नगर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी आले. या चोट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले नितीन ठाकरे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

    डोंबिवली : रमी सर्कलवर पैसे हरले आणि त्यामुळे कर्जबाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी चक्क तरुणाने एका वयोवृद्ध महिलेला लुटले. मात्र एका धाडसी तरुणाने या चोरट्याला पाठलाग करून पकडले आहे. चोरटा नितीन ठाकरे विष्णू नगर पोलिसांच्या ताब्यात आहे. तर या चोरट्याला पकडणारा तरुण सर्वेश राऊत (Sarvesh Raut) याचे सर्वत्र कौतुक होत आहे. डोंबिवली पूर्वेकरील राहणाऱ्या ७० वर्षीय वयोवृद्ध महिला सुवर्णा नेवगी या काही खरेदी करण्यासाठी बुधवारी दुपारी डोंबिवली पश्चिमेला गेल्या होत्या. खरेदी करून त्या डोंबिवली पश्चिमेतील गांधी उद्यान परिसरात असलेल्या रेल्वे पुलाच्या जीन्यातून डोंबिवली पूर्वेकडील येत होत्या.

    याच दरम्यान एक तरुण त्यांच्या जवळ आला. त्यांनी सुवर्णा (Suvarna)यांच्या गळ्यातील महागडे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी जाणाऱ्या सर्वेश राऊत नावाच्या तरुणाने बघितला. सर्वेश यांनी धाडस दाखवत त्या चोरट्याचा पाठलाग सुरू केला. अखेर पाचशे मीटरच्या अंतरावर त्यांनी चोरट्याला पकडलं. याच दरम्यान त्या ठिकाणी विष्णू नगर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी आले. या चोट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले नितीन ठाकरे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या तरुणाचे नाव आहे. नितीन हा खाजगी नोकरी करतो.

    याबाबत विष्णुनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमोल आंधळे यांनी सांगितले की, नितीन ठाकरे याला रमी सर्कलवर गेम खेळण्याची सवय आहे. या खेळामुळे तो कर्जबाजारी झाला आहे. कर्ज झाल्याने पैसे कसे फेडणार या चिंतेत तो होता. यासाठी त्यांनी चोरीच्या मार्ग निवडला. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. विष्णू नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे ऑनलाइन वर सुरू असलेल्या गेम मुळे लोकांवर काय परिणाम होत आहे. याच्या एक जिवंत उदाहरण समोर आले आहे. नितीन यांनी या आधी देखील असा प्रकारच्या काही गुन्हा केला आहे का? याच्या देखील तपास सुरू आहे.