डोंबिवलीत ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडत ७५ लाखांचा मुद्देमाल लंपास

डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोड परिसरात रत्न सागर हे ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात भिंतीला भगदाड पाडून चोरट्याने 110 किलो चांदी आणि काही प्रमाणात सोन्याचे दागिने चोरले आहेत.

    डोंबिवली : एका जवलेर्सच्या दुकानात भिंतीला भगदाड पाडून सुमारे 75 लाखांचे दागिचे चोरल्याची घटना डोंबिवलीमध्ये समोर आली आहे. बाजूचा गाळा भाड्याने घेऊन अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. डोंबिवली विष्णू नगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोड परिसरात रत्न सागर हे ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात भिंतीला भगदाड पाडून चोरट्याने 110 किलो चांदी आणि काही प्रमाणात सोन्याचे दागिने चोरले आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की रत्न सागर ज्वेलर्सच्या शेजारीच असलेला गाळा काही तरुणांनी भाड्याने घेतला होता. हे तरुण झारखंड येथील राहणारे होते त्यांनी मोमोज तयार करण्याचा बोर्ड लावला होता.

    ही घटना घडल्यानंतर चोरटे पसार झाले आहेत विष्णू नगर पोलीस तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरातील एका ज्वेलर्स दुकानात देखील चोरी झाली होती हे आरोपी नेपाळी होते. पुन्हा डोंबिवलीत अशाप्रकारे घटना घडल्याने ज्वेलर्समध्ये एकच दहशतीचं वातावरण तयार झालं आहे.