धाब्यावर गाणी लावण्यावरून तरुण-तरुणींमध्ये वाद, तरुणाने केला तरुणीचा विनयभंग, पीडितेच्या मैत्रिणींना केली मारहाण

पीडित तरुणी काल आपल्या दोन मैत्रिणींसोबत डोंबिवली पूर्वेकडील ९० फिट रोडवरील एका ढाब्यावर जेवणासाठी गेली होती. जेवत असताना सुमित गायकवाड व त्याच्या मित्रांनी ब्लूटूथ वरून मराठी गाणी लावली होती.

    डोंबिवली : धाब्यावर जेवण करत असताना गाणी लावण्यावरून चार तरुण आणि तीन तरुणींमध्ये वाद झाला. तरुणांनी या तरुणींचा व्हिडिओ काढला, पीडितेने व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले असता संतापलेल्या तरुणाने तरुणीचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर या तरुणाच्या मित्रांनी पिडितेच्या दोन मैत्रिणींना मारहाण केली. डोंबिवली पूर्वेकडे ९० फीट रोडवरील धाब्यावर काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात सुमित गायकवाड, राहुल शेलार, सुमित काळे व दानेश खान या चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू केला आहे .

    पीडित तरुणी काल आपल्या दोन मैत्रिणींसोबत डोंबिवली पूर्वेकडील ९० फिट रोडवरील एका ढाब्यावर जेवणासाठी गेली होती. जेवत असताना सुमित गायकवाड व त्याच्या मित्रांनी ब्लूटूथ वरून मराठी गाणी लावली होती. पीडिता व तिच्या मैत्रिणीने सुमितला हिंदी गाणी लावण्याची विनंती केली. यावरून पीडिता तिच्या मैत्रिणी आणि सुमित गायकवाड व त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला. सुमित गायकवाड यांच्या मित्रांनी या पीडित तरुणींचा व्हिडिओ काढला. पीडीतेने हा व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले असता संतापलेल्या सुमित गायकवाडने पीडितेचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर सुमितचे मित्र राहुल शेलार, दानिश खान, सुमित काळे यांनी पीडितेच्या मैत्रिणींना मारहाण केली. याप्रकरणी पीडितेने डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार पोलिसांनी सुमित गायकवाड व त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.