स्टूल उचलायला सांगितला म्हणून पतीने फासावर लटकवले पत्नीला

एवढे बोलून घरातील एका गॅलरीत कपडे सुकवण्यासाठी ठेवलेल्या नायलॉनच्या रस्सीच्या सहाय्याने तिला घरातील फॅन लटकवण्याच्या अँगलला रस्सी बांधून तिला लटकवले.

    डोंबिवली : लोखंडी स्टूल उचलायला सांगितलं म्हणून पतीने पत्नीला फासावर चढवून मारायचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक घटना डोंबिवली मध्ये घडली. मानपाडा पोलीस निर्दयी पतीच्या शोधात आहे. खुशाल जाधव असे या पतीचे नाव असून आठ महिन्यापूर्वी खुशाल आणि तनिषा या दोघांचे लग्न झाले आहे. कल्याण पूर्व येथील मलंगडरोड परिसरात स्काय अबीएन्स सोसायटी आहे. या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर खुशाल जाधव आपली पत्नी तनिषा सोबत राहतो. आठ महिन्यापूर्वी खुशाल आणि तनिषा या दोघांचे लग्न झाले आहे. खुशाल सध्या काही काम करीत नाही. दोघे जळगावचे राहणारे आहेत.

    २२ ऑक्टोबर रोजी दोघे पती-पत्नी गावी गेले असता तनिषा याचा मानेवर व्रण दिसल्याने तिच्या मामाने तिला या संदर्भात विचारले. मामाकडून विचारपूस झाल्यानंतर तनिषानी जी हकीकत सांगितली तो ऐकून मामा हैरान झाले. तनिषांनी सांगितले की, १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास ती घरात काम करत होती. तिने पती खुशालला सांगितले की मला घरात साफसफाई करायची आहे लोखंडी स्टूल उचलून गॅलरीमध्ये ठेवा. फक्त एवढे बोलल्याने खुशाल याने पत्नीला मारहाण सुरू केली. तू नेहमी मला काम सांगते काही न काही बोलत राहते. तुझा आवाज आज बंदच करून टाकतो. एवढे बोलून घरातील एका गॅलरीत कपडे सुकवण्यासाठी ठेवलेल्या नायलॉनच्या रस्सीच्या सहाय्याने तिला घरातील फॅन लटकवण्याच्या अँगलला रस्सी बांधून तिला लटकवले.

    खाली टेबल होता पायाने तो टेबल खुशाल याने बाजूला केला. जवळपास पाच ते सहा सेकंद तनिषा ही लटकत होती. कसाबसा तिने आपला जीव वाचवला. तनिषाने सर्व प्रकार सांगितल्यानंतर मामा तिला घेऊन जळगाव येथील रहात असलेल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात नेले. त्या ठिकाणी पोलिसांना सांगितले की ज्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे त्या ठिकाणचा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा. त्यानंतर तनिषा आणि तिच्या मामा मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले. या ठिकाणी सर्व हकीकत सांगितल्यानंतर मानपाडा पोलिसांनी भादवी ३०७ प्रमाणे खुशाल जाधव याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी गणेश भुवड या प्रकरणाचा तपास करीत आहे. खुशाल हा जळगावला पळून गेला आहे त्याला अटक करण्यासाठी मानपाडा पोलिसांनी एक पथक नेमले आहे. लवकरात लवकर त्याला अटक होणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.