लग्नापूर्वी बॉयफ्रेंडने फोटो पाठवून केले ब्लॅकमेल, धमकी देऊन केली पैशांची वारंवार मागणी, विवाहित महिलेने केली आत्महत्या, एक महिन्यानंतर खुलासा

मानपाडा पोलीस ठाण्यात अजय ऋषिपाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.

    डोंबिवली : महिनाभरापूर्वी घराच्या गॅलरीतून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याबाबत डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृत महिलेला तिच्या लग्नापूर्वीचा बॉयफ्रेंड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी वारंवार करत होता. त्यामुळे महिला मानसिक तणावात होती. याच तणावातून महिलेने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी हरियाणा येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. हा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात अजय ऋषिपाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.

    डोंबिवली पूर्व देसले पाडा परिसरामध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेचा राहत्या घराच्या गॅलरीतून पडून मृत्यू झाल्याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. गॅलरीत कपडे सुकवताना महिला गॅलरीतून खाली पडून जखमी झाली होती आणि नंतर तिचा मृत्यू झाला होता असे सांगण्यात आले होते. या घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मानपाडा पोलिसांनी एफआयआर दाखल करीत या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या महिलेच्या कुटुंबीयांनी हरियाणा येथील पोलीस ठाण्यात अजय ऋषिपाल नावाचा इसम मृत पावलेल्या महिलेला तिचे जुने फोटो वायरल करण्याचे धमकी देत तीच्याकडून पैशाची मागणी करत तिला ब्लॅकमेल करत होता.

    त्यामुळे मानसिक तणावातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी अजय ऋषिपाल या इसम विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सर्जेराव पाटील हे करीत आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल असं त्यांनी सांगितले आहे.