महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन चोरट्यानां रेल्वे क्राइम ब्रांच पोलिसांनी केली अटक

डोंबिवली ते सीएसटी प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकात महिलांचे महागडे दागिने हिसकावून दोन चोरटे पसार झाले होते. सीसीटीव्हीच्या साहाय्याने रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

    डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे चोरीची घटना वाढल्या होत्या. अशीच दोन घटना घडल्या होत्या याप्रकरणी रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे.

    डोंबिवली ते सीएसटी प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकात महिलांचे महागडे दागिने हिसकावून दोन चोरटे पसार झाले होते. सीसीटीव्हीच्या साहाय्याने रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस आयुक्तांचा मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी हर्षद शेख यांचे पथक चोरट्यांच्या शोध घेत होते. तपासा दरम्यान एक आरोपी निष्पन्न झाला त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. अखेर या चोरट्याच्या साथीदाराला देखील उत्तर प्रदेश हून अटक करण्यात आली आहे.

    अमन खरवार आणि राेहित यादव अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशातील राहणारे आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने आधी अमनला अटक करण्यता आली. अमनने सांगितल्यावर पोलिसाचे एक पथक उत्तर प्रदेशात गेले. त्यानंतर रोहितला अटक करण्यात आली. या दोघांकडून चोरी केलेले महागडे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत, या दोघांनी आणखी किती गुन्हे केले आहे का याचा तपास आता पोलीस करीत आहेत.