महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या दानपेटीत कोट्यवधींचे दान, कोजागिरीला उत्पन्नात होणार आणखी वाढ

कोरोनाच्या संकटानंतर २ वर्षांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र उत्सव उत्सहात संपन्न झाला आहे. यावेळी तुळजा भवानीचे दर्शन लाखो भाविकांनी घेतले. कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात येथील भाविकांनी तुळजा भवानीच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे.

  उस्मानाबाद : कोरोनाच्या (Corona) संकटानंतर २ वर्षांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा (Tulja Bhawani) नवरात्र उत्सव उत्साहात संपन्न झाला आहे. यावेळी, तुळजा भवानीचे दर्शन लाखो भाविकांनी घेतले. कर्नाटक (Karnataka), तेलंगणा (Telangana), आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात (Gujarat) येथील भाविकांनी तुळजा भवानीच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. यंदा भाविकांनी तुळजा भवानीच्या दानपेटीत कोटींचे दान दिले आहे. हे उत्पन्न आणखी वाढेल. कोजागिरी पौर्णिमेला दानाची रक्कम आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त कण्यात आला आहे.

  तीन कोटी ७० लाखांची देणगी विविध स्वरुपात मंदिर संस्थानला मिळाली आहे. हे उत्पन्न पहिली माळ ते नववी माळपर्यंतचे आहे. कोजागिरी पौर्णिमेला अजून उत्पन्न वाढणार असल्याची शक्यता आहे.
  तुळजा भवानी मंदिर संस्थानला या मार्गाने देणगी स्वरुपात उत्पन्न मिळाले आहे.

  रोख देणगी – १ कोटी ६७ लाख ९६ हजार २०० रुपये
  सिंहासन पेटी- १ कोटी ५ लाख ३७ हजार ९७० रुपये
  दानपेटी – ७२ लाख ६३ हजार ३० रूपये
  विश्वस्त निधी- १८ लाख २१ हजार ३७५ रुपये
  मनी ऑर्डर – २ लाख ४६ हजार ३३५ रूपये
  नारळ विक्री – २ लाख ४४ हजार ७०० रुपये
  धनादेश देणगी – ८७ हजार ४६९ रुपये
  ऑनलाईन देणगी – ५१ हजार
  नगदी अर्पण – २२ हजार ११४ रुपये