मुंबईचा लचका तोडणाऱ्यांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे

आज मुंबईतील बीकेसी येथील शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून भाजपला धारेवर धरले. खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष देशाची दिशी भरकटवत आहे. आमचा हिंदुत्व अतिरेक्यांना बडवणारा हिंदुत्व आहे. गाढव आमच्या सोबत होते, त्यांनी लात मारायच्या आत आम्ही त्यांना लात मारली, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

    मुंबई – फडणवीस म्हणाले होते, आम्ही मुंबई स्वतंत्र करणार, तुमच्या 1707 पीढ्या जरी आल्या तरी ते होऊ देणार नाही. मुंबई आंदन म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली नाही, तिला हिरवणाऱ्यांचे तुकडे करणार, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.

    आज मुंबईतील बीकेसी येथील शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून भाजपला धारेवर धरले. खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष देशाची दिशी भरकटवत आहे. आमचा हिंदुत्व अतिरेक्यांना बडवणारा हिंदुत्व आहे. गाढव आमच्या सोबत होते, त्यांनी लात मारायच्या आत आम्ही त्यांना लात मारली, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

    मुंबईतील बीकेसीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा झाली. गेल्या एक महिन्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या घटनांमध्ये उद्धव ठाकरेंना लक्ष करण्यात आले. राणा दाम्पत्याचा हनुमान चालिसा मुद्दा, आयोध्या भेट, हिंदुत्व, केतकी चितळे यांची पवारांवरील पोस्ट या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील याकडे आज सर्वांचे लक्ष लागले होते.

    बीकेसीत झालेल्या या सभेला शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी ओवैसी बंधूंचा समाचार घेतला. अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये औरंगझेबच्या कबरीचे दर्शन घेतले होते. यावर राऊत यांनी ओवैसींना चांगलेच फटकारले.