falguni pathak in kalyan

बृहन्मुंबई महानगरपालिकेने बोरीवली येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथील भुखंड खेळाचे मैदान म्हणून निश्चित केले असताना मात्र, या मैदानावर नवरात्रोत्सवानिमित्त फाल्गुनी पाठक हिच्या गरभ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे वृत्तपत्रातील वृत्तात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

    मुंबई – दांडीया क्वीन फाल्गुनी पाठकच्या गरबा कार्यक्रमावर आक्षेप घेत खेळाच्या मैदानाचे व्यावसायिकीकरण रोखण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. सदर याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेने बोरीवली येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथील भुखंड खेळाचे मैदान म्हणून निश्चित केले असताना मात्र, या मैदानावर नवरात्रोत्सवानिमित्त फाल्गुनी पाठक हिच्या गरभ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे वृत्तपत्रातील वृत्तात प्रसिद्ध करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी या कार्यक्रमावर जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. या कार्यकमासाठी ८०० ते ४२०० रुपयापर्यंत तिकिट दरही निश्चित करण्यात आला असून त्यालाच याचिकेतून आक्षेप घेतला आहे.

    हे खेळाचे मैदान सर्वांसाठी खुले असताना अशी प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचे व्यावसायिकीकरण केले जाऊ नये, अशी अपेक्षा याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या कालावधीत संगीत कार्यक्रम अथवा नवरात्रोत्सवात गरब्यासाठी या क्रिडांगणाचा वापर होत असेल तर मैदानावर सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.