शेतकऱ्याच्या पोरांना हातात बंदुका घ्यायला लावू नका, स्वाभिमानीचा इशारा; इस्लामपूर रस्त्यावर रास्ता रोको

ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी, गतवर्षीचा दुसरा हप्ता ४०० रुपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने इस्लामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याच्या पोरांना हातात बंदुका घ्यायला लावू नका, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

  सांगली : ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी, गतवर्षीचा दुसरा हप्ता ४०० रुपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने इस्लामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याच्या पोरांना हातात बंदुका घ्यायला लावू नका, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

  दरम्यान, इस्लामपूर रस्त्यावर दुतर्फा तीन ते चार किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या, यावेळी पोलीस कार्यकर्ते आणि वाहन धारक यांच्यात किरकोळ वादावादी झाली आंदोलनाचे नेतृत्व महेश खराडे, संजय बेले यांनी केले.
  ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळालीच पाहिजे, गत वर्षीचा दुसरा हप्ता ४०० रुपये मिळाला पाहिजे, दरोडेखोर साखर सम्राटाचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडण्यात आला.
  सुनील फराटे यांचे भाषर झाले. यावेळी संजय बेले, बाबा सांडरे, दीपक मगदूम, दस्तगीर मुजावर,राहुल कोळी, सुभाष पाटील, सौरभ पाटील, बबलू मुजावर, संदीप शिरोते, रवींद्र आडमुठे, शीतल सांद्रे, नितीन पंडित, शेतकरी उपस्थित होते.

  ये तो ट्रे लर है पिक्चर अभी बाकी है
  आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले, गेली दोन महिने ऊस दराचे आंदोलन सुरू आहे, मात्र शेतकऱ्याचा आवाज बहिऱ्या साखर सम्राटांपर्यंत पोहचला नाही. ये तो ट्रे लर है पिक्चर अभी बाकी है, त्यामुळे साखर सम्राटांनी लवकर दराची कोंडी फोडावी अन्यथा टोकाचा संघर्ष करायला लावू नका. हक्काचे मागत असताना ते देत नसाल तर ना इलाजाने शेतकऱ्याच्या पोरांना हातात बंदुका घ्यायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला.