माझ्या नादाला लागू नका; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा

मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्यात आला आहे. २४ डिसेंबरला मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच. जर या आरक्षणाच्या आड काेणी आले तर त्याला पाहून घेऊ, असे म्हणत मनाेज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये येऊन छगन भुजबळ यांना नाव न घेता आव्हान दिले.

  नाशिक :  मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्यात आला आहे. २४ डिसेंबरला मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच. जर या आरक्षणाच्या आड काेणी आले तर त्याला पाहून घेऊ, असे म्हणत मनाेज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये येऊन छगन भुजबळ यांना नाव न घेता आव्हान दिले. मराठे शांत आहेत ताेपर्यंत शांत राहू द्या, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर महागात पडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला. राज्यात मराठा-ओबीसी समाजांत दंगल घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे. त्याला समाजाने बळी पडू नये, आपले आंदोलन शांततेत सुरू आहे अन‌ शांततेतच राहू द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी समाजबांधवांना दिले.

  आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असे समीकरण तयार झाले आहे. याच मुद्यावरून मराठा आरक्षणाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील व ओबोसी नेते छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपलेली आहे. हल्ली दोघेही एकमेकांवर खरमरीत टीका करत असतात. मनोज जरांगे पाटील यांची नाशिक येथे सभा पार पडली. यावेळी मराठा आरक्षणावरून त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता अत्यंत तिखट टीका केली. जरांगे सभे दरम्यान म्हणाले की, फक्त मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी लढतो आहे. मला जनता पाहिजे, सत्तेची हाव नाही. मराठा समाजाचे आरक्षण अंतिम टप्प्यात असून काहींचे हिशोब चुकते करायचे. असा टोला जरांगे यांनी लागावला आहे. पुढे ते भुजबळ यांच्यावर निशाणा साधत म्हणले टिका केली आहे.

  पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा नेत्यांनी साथ दिली असती तर मराठा समाजाला २ तासात आरक्षण मिळाले असते. परंतु ही मराठा समाजाची शोकांतिका आहे, पुढे जरांगे म्हणाले, ते म्हणतात आमच्यात येऊ नक, मग आम्ही कुठे जायचे, सगळ तूम्ही एकटेच खाणार आहात का? घटनेच्या पदावर बसलेला कायदा पायाखाली तुडवत आहेत. दंगली होतील असे वक्तव्य करू लागले आहेत. भुजबळ यांना व्यक्ती म्हणून कधीच विरोध नव्हता त्यांच्या विचाराला विरोध होता. मात्र, आता त्यांना व्यक्ती म्हणूनदेखील आमचा त्यांना विरोध असणार आहे, असेही त्यांनी यावेळी बाेलताना स्पष्ट केले.

  …ताेंड उघडायला लावू नका
  ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणजेच मिळणारच आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहेच. त्यांचे वय झाले असल्याने त्यांना काहीच सूचत नाही. त्यांना माझे सर्व काही माहीती असेल तर मला देखील त्यांचे सर्व काही माहीत आहे. कोणाची जमीन खाल्ली?  कोणाचे बंगले हडपले? मला देखील त्यांचे सर्व काही माहीत आहे. मला शांत राहू दे, उगाच डिवचू नक. आमचा आग्यामोहळ मागे लागला तर पळता भुई थाेडी करून टाकू, असा इशाराही त्यांनी नाव न घेता भुजबळांना दिला. माझ्या नादाला लागू नक. एक सभा घेतली, पण मुबईत जाईपर्यंत त्यातील अर्धे फुटले. आता जे व्हायचे ते होऊ द्या, खेटायच ठरवलय तर खेटायचचे. पण, या सगळ्या टोळीच्या लक्षात आले की, मराठा ओबीसीच्या आरक्षणात गेला आहे. त्यामुळे दंगली करायच्या यांचा कट असू शकतो, पण आपल्याला संयम ठेवायचे आहे. यांचा कट यशस्वी करू द्यायचा नाही. असे ही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

  पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, मोठ्या माणसांना आम्ही गरीब लोकं काही बोलत नाही. गरीब मराठ्यांना विरोध करणारे मोठे माणसे, त्यांना आम्ही काय उत्तर देणार आहे. दुसऱ्याचे खाऊन बसले, त्यामुळे त्यांना आम्ही काय बोलणार आहे. आता त्यांना द्यायचे जीवावर आले आहे. आमचा सामान्य गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, पण त्यांना गरजवंतांची गरज नाही. त्यांना त्यांच्या बरोबरीचे लोकं हवे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आम्हाला काहीच बोलायचं नाही. असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.