पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, कृषीमंत्री दादा भुसेंचं शेतकऱ्यांना आवाहन

पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांनी पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, असे आवाहन केले आहे.

    राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, असे आवाहन केले आहे. दादा भूसे कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    गेल्या अनेक दिवसापासून पावसाची प्रतिक्षा शेतकरी करती आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व सरी कोसळल्यानंतर राज्यात पेरणीच्या कामाला वेग आला होता. मात्र, आता पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांनी पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, असे आवाहन केले आहे. दादा भूसे कोल्हापूर दौऱ्यावरआले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.