मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार डबलडेकर एसी बस…

     

    मुंबईकरांसाठी आंनदाची बातमी एसी लोकलनंतर , आता बेस्ट मध्ये एसी डबलडेकर ही मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार. तसेच  लोकलनंतर (Local) बेस्टहीच (Best) मुंबईची लाईफलाईन मानली जाते. कोरोना काळात लोकल बंद होती तेव्हा मुंबईकर हे बेस्टवरच अवलंबून होते. प्रवासाचा दर्जा सुधारावा तसेच बेस्टला आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळाला.

    यासाठी आता लवकरच प्रवाशांच्या (Passengers) सेवेत एसी डबलडेकर बस दाखल होणार आहे. बेस्ट दिनानिमित्त ऑगस्ट महिन्यात डबलडेकर एसी बस बेस्टच्या विभागात दाखल होणार आहे. त्यानंतर तिच्या चाचण्या घेण्यात येतील. सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही बस रस्त्याने धावताना दिसणार आहे. सध्या बेस्टकडे एकूण ४५ डबल डेकर बस आहेत.

    बेस्टच्याही नवीन डबलडेकर बस भारत ६ श्रेणीमधील असून, तिला दोन स्वयंचलित दरवाजे आहेत. या दरवाजांचे संपूर्ण नियंत्रण हे चालकाकडे अरणार आहे. या बसमध्ये सीसीटीटीव्ही कॅमरा देखील असणार आहे. या बसचे गिअर हे स्वयंचलित आहेत. समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे बेस्टकडून अशा ९०० बस भाडे तत्वावर घेतल्या जाणार आहेत. या बसच्या चार्जिंगसाठी मुंबईत ५० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.