ठाकरे गटाला मोठा धक्का; आता ‘हा’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश

शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेत नेतेमंडळींचे इन्कमिंग सुरु आहे. त्यात आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत (Dr.Deepak Sawant) हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

डॉ. दीपक सावंत हे शिवसेनेत म्हणजेच सध्याच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती दिली जात आहे. थोड्याच वेळात त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता डॉ. सावंत हे प्रवेश करत आहेत.

दरम्यान, डॉ. दीपक सावंत यांचा बाळासाहेब भवन येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी डॉ. दीपक सावंत यांनी विधान भवनात जाऊन भेट घेतली होती. आता त्यांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे.