
मुंबई : शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेत नेतेमंडळींचे इन्कमिंग सुरु आहे. त्यात आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत (Dr.Deepak Sawant) यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
डॉ. दीपक सावंत हे शिवसेनेत म्हणजेच सध्याच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी डॉ. सावंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात जी सेंटर्स उभी केली, जी कामं केली. ती सेंटर्स, ती कामे पाहत होतो. असे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत. आपण आरोग्यखात्यात काही तरी चांगलं करू शकू, त्यांच्या मदतीने असे वाटले. म्हणून त्यांच्या पक्षात जाण्याचं ठरवलं’.
दरम्यान, डॉ. सावंत यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानंतर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आज सावंत यांनी प्रवेश केला आहे.
शिवसेनाप्रमुखांनी खूप काही दिलं
शिवसेनाप्रमुखांनी खूप काही दिलं. पहिली आमदारकी त्यांनी दिली. नंतर उद्धव साहेबांनी आमदारकी नंतर मंत्रिपद दिलं. त्यामुळं मी जाहीर आभार मानतो. शिंदे साहेबांच्या रूपाने मला कामाची दिशा मिळेल असे वाटले म्हणून मी त्यांच्यासोबत आहे, असेही त्यांनी सांगितले.