डॉ. संभाजीराजे पाटील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार; तयारीसाठी कसली कंबर

आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. तरी अद्याप तारखा जाहीर न झाल्याने सध्या तरी उमेदवारांनी मात्र तिकीट मिळो अथवा नको, काहीही झाले तरी निवडणूक लढवणारच, या जिद्दीने मतदारसंघात भेटीगाठी, याबाबत संपर्क सुरू केले आहेत भूमिका एरंडोल-पारोळा-भडगांव या विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. संभाजीराजे पाटील यांनी कंबर कसली.

    नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. तरी अद्याप तारखा जाहीर न झाल्याने सध्या तरी उमेदवारांनी मात्र तिकीट मिळो अथवा नको, काहीही झाले तरी निवडणूक लढवणारच, या जिद्दीने मतदारसंघात भेटीगाठी, याबाबत संपर्क सुरू केले आहेत भूमिका एरंडोल-पारोळा-भडगांव या विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. संभाजीराजे पाटील यांनी कंबर कसली असून, जवळपास संपूर्ण मतदारसंघाचा दौरा (एकवेळ) पूर्ण झाला असून अपक्ष लढण्याची तयारी असल्याची माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.

    एरंडोलला आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मतदारसंघातील विकास कामांसह पद्मालय मंदिर, वसंत साखर कारखाना, औद्योगिक वसाहत, मेडीकल कॉलेज, नारपार योजना आदींसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच गरीबांसाठी, मुला-मुलींसाठी डॉ. संभाजीराजे फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्यसेवा देणार व सध्या दिली जात असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मतदारांचा विश्वासघात करणार नाही तसेच नागरीकांसाठी मतदारांसाठी सतत संपर्कात राहून काम करणार हे स्पष्ट केले.

    मतदारसंघात शेतकरी वर्गासाठी शेतीला वीज, पाणीपुरवठा, रस्ते विकासासाठी कटीबध्द राहण्याची ग्वाही दिली. गलिच्छ राजकारण करणार नाही, मतदारांचा विश्वासघात करणार नाही. याबाबत आश्वासन देवून प्रथमच निवडणूक लढवित असलो तरी सेवा, सद्भाव, समृध्दी या त्रिसूत्रीचा वापर करूनच आचरण करणार असल्याची देखील ग्वाही त्यांनी यावेळी दिली.