Dr. Vinayak Kale appointed as new dean of Sassoon Hospital
Dr. Vinayak Kale appointed as new dean of Sassoon Hospital

  पुणे : अंमली पदार्थ विक्री प्रकरणात वादग्रस्त ठरलेले ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे  डॉ. विनायक काळे यांची अधिष्ठातापदी नियुक्ती होईल.
  डॉ. काळे यांची बदलीच्या विरोधात मॅटमध्ये धाव
  जानेवारी महिन्यात डॉ. काळे यांची बदली करून त्या जागी डॉ. ठाकूर यांची  नियुक्ती केली गेली होती.  त्यानंतर डॉ. काळे यांनी बदलीच्या विरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यामध्ये निकाल विरोधात गेल्यानंतर मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. त्यावरील सुनावणीमध्ये डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द ठरवली आहे. त्यामुळे डॉ. काळे यांची पुन्हा अधिष्ठातापदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
  उच्च न्यायालयाकडून संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द
  डॉ. संजीव ठाकूर यांची बी.जे. अधिष्ठातापदावरून उचलबंगडी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची मध्यावधी बदली झाली होती. त्या विरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. मॅटने डॉ.काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पुन्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती
  बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची जानेवारी महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. ससून रुग्णालयातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर डॉ. संजीव ठाकूर यांची वर्णी ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती. ते अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती.
  डॉ. ठाकूर सर्जरी विभागाचे प्रमुख
  ते सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापदी कार्यरत होते. डॉ. काळे हे जे. जे. रुग्णालयातील उपअधिष्ठाता पदावरून पदोन्नतीने दीड वर्षांपूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी रुजू झाले होते. मात्र, तीन वर्षांच्या आतच त्यांची बदली करण्यात आली, तर डॉ. ठाकूर यापूर्वी ससून रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
  डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे मागितली दाद
  त्या विरोधात काळे यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पून्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.