
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्र संहिता लागू आहे. देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि इतर प्रार्थना स्थळी ड्रेस कोड लागू आहे. त्याच धर्तीवर राज्यातील मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करावा, अशी भूमिका असल्याचं महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितलं आहे.
नागपूर: महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या (Maharashtra Mandir Mahasangh) वतीने नागपुरातील (Nagpur News)) चार मंदिरात वस्त्र संहिता अर्थात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मंदिरातील पावित्र्य जपण्यासाठी नागपूरातील 4 मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू केल्याचं महासंघाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आलं.(Nagpur Temple Dress Code)
तोकडे कपडे घातले तर ओढणी आणि पंचा घेऊन करावा लागेल प्रवेश
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्र संहिता लागू आहे. देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि इतर प्रार्थना स्थळी ड्रेस कोड लागू आहे. त्याच धर्तीवर राज्यातील मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करावा, अशी भूमिका असल्याचं महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितलं आहे. तोकडे कपडे घालून मंदिरात आल्यास त्यांना ओढणी, पंचा दिला जाईल, त्यानंतर त्यांना प्रवेश दिला जाईल. यासंदर्भात प्रचार प्रसारही केला जाणार असल्याचे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मंदिराचे पावित्र्य राखण्याची गरज
काही पुरोगामी लोक किंवा आधुनिक समजणारे लोक विरोध करतील, मात्र इतर धर्मातील लोकांना विरोध केला जात नाही, मग मंदिरातच का? असा सवाल उपस्थित करत मंदिराचे पावित्र्य कायम राहावे हा यामागचा उद्देश असल्याचे घनवट यांनी स्पष्ट केले.
तुळजापूरला लावण्यात आला होता ड्रेस कोड
काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थानच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्या नियमावलीचे फलक मंदिरात लावण्यात आले. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही,असं सांगण्यात आलं. मंदिर आणि मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली 18 मे रोजी भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावण्यात आले आहेत.
मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाही. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठीही नियम लावण्यात आले आहेत.