Married woman commits suicide due to fear of husband's suspicious attitude, beatings, death threats

    पुणे : चारचाकीचा चालक व सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या चालकाने सासऱ्यांसमोर मालकाने शिवीगाळ केल्याच्या नैराश्यातून सहा मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाईलमध्ये व्हिडीओ बनविला असून, त्यात कोणामुळे व का आत्महत्या करीत असल्याचे सांगितले आहे.

    बुधवारी भरदिवसा घडली घटना

    तोहिद मेहमूद शेख (वय २५, रा. कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अरबाज वली मोहम्मद मेमन याच्यावर भादवी कलम ३०६ नुसार गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. ही घटना बुधवारी भरदिवसा घडली आहे. तोहिद हा अरबाज यांच्याकडे गेल्या चार वर्षांपासून चारचाकीचा चालक व सुपरवायझर म्हणून काम करत होता.

    कामावर न आल्याने मालकासोबत झाली वादावादी

    त्यांच्यात कामावर न आल्यावरून वादावादी झाली होती. तेव्हा अरबाज यांनी तोहिद याच्या सासऱ्यांसमोरच वाईट शिवीगाळ केली व अपमानित केले. या नैराश्यातून तोहिद याने कौसरबाग येथे सुरू असलेल्या एका बांधकाम इमारतीच्या सहाव्या माजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी तोहिद याने स्वत:च्या मोबाईलवर व्हिडीओ बनविला आहे. तो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला असून, आरोपी पसार झाला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.