farmer waiting for rain

यंदा सरासरी पेक्षा खूपच कमी पर्जन्यमान झाले, याचा परिणाम पेरणीवर झाला कशीबशी पन्नास टक्के पेरणी झाली, मात्र आता गेल्या तीन आठ्वड्यंपासून पावसाने दडी मारल्याने ही पिके जळून गेली आहेत. परिणामी जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  प्रवीण शिंदे, सांगली : यंदा सरासरी पेक्षा खूपच कमी पर्जन्यमान झाले, याचा परिणाम पेरणीवर झाला कशीबशी पन्नास टक्के पेरणी झाली, मात्र आता गेल्या तीन आठ्वड्यंपासून पावसाने दडी मारल्याने ही पिके जळून गेली आहेत. परिणामी जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
  सांगली जिल्हा म्हटल की, पावसाळ्यात दहा पैकी पाच तालुक्यात महापूर अशी परिस्थिती असायची मात्र यंदा परिस्थिती अत्यंत दाहक बनत चालली आहे. कारण ऐन पावसाळ्यात नद्या कोरड्या पडल्याने नदी काठावरील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव या तालुक्यात देखील पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे, तर दुष्काळी असणाऱ्या जत, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ सारख्या तालुक्यात असणारे तलाव कोरडे ठणठणीत असल्याने दुष्काळी परिस्थिती आली आहे.
  जत, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसतो आहे. या तालुक्यांमध्येही ज्या भागात सिंचन योजनांचे पाणी पोहचले नाही, त्या भागात तर आताच भीषण अवस्था आहे. जत तालुक्यात सुमारे ६५ गावात अध्याप सिंचन योजना पोहचली नाही, कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर सिंचन योजना आलीय पण अद्या पूर्णक्षमतेने पाणी मिळू शकले नाही. तासगाव पूर्व भागातही पाणी पोहचले नाही. मिरज तालुक्यातील देखील काही गावे लाभक्षेत्रापासून वंचित आहेत.रुपयांच्या पीक विम्यामुळे कागदावर पेरणी
  जिल्ह्यात खरीप पेरणीचे सरासरी दोन लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे एक लाख तीस हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाकी एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली नाही. आता उशिरा पेरणी करून पीक व्यवस्थित येत नाही. त्याशिवाय पुढील हंगामही सापडत नाही. त्यामुळे पन्नास टक्के क्षेत्रातील खरीप हंगाम वाया गेला आहे, पण या पन्नास टक्के पैकी बरीच पेरणी शासनाच्या एक रुपयांत पीक विमा योजनेमुळे पेरणी नसताना दाखवण्यात आलेली आहे.

  जिल्ह्यातील तालुकानिहाय खरीप पेरणी झालेले क्षेत्र टक्केमध्ये
  तालुका ———–टक्केवारी
  मिरज————१४.९ टक्के
  जत————–४६.६ टक्के
  खानापूर———-५१.४ टक्के
  वाळवा————३३.३ टक्के
  शिराळा————-८७.३ टक्के
  आटपाडी———–१०० टक्के
  कवठेमहांकाळ——४१.५ टक्के
  पलूस—————-५८ टक्के
  कडेगाव————–२९.९ टक्के
  एकूण—————–५०.६२ टक्के

  जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठा
  तालुका ———तलाव—–सध्याचा साठा—–टक्के
  तासगाव———७———३३.३७———–६ टक्के
  खानापूर———८———२२२.०४———२१ टक्के
  कडेगाव———-७———४६४.०५———६३ टक्के
  शिराळा———-५———१०५१.९२——–९८ टक्के
  आटपाडी———१३——-३११.८६———-२१ टक्के
  जत—————२७——-४११.०२———–३ टक्के
  कवठेमहांकाळ——-११——-१७३.९०———-११ टक्के
  मिरज—————३——-३५.८०————१२ टक्के
  वाळवा————–२——-३२.४२————६० टक्के
  एकूण————–८३——–२७९७.७९——-२३ टक्के