Lalit Patil
Lalit Patil

    पुणे : राज्यात गाजलेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात खळबळजनक माहिती समोर येत असून, ललित पाटीलला पुण्यातील संस्था चालक विनय  अ-हान याने कैदी ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला “त्या” मैत्रिणीला भेटण्यासाठी फ्लॅट दिल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
    ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार
    दरम्यान, ललित पाटील पळून गेल्याप्रकरणी काल अटक विनय अ-हानाला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भादवी कलम 224, 225 नुसार गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांनी 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्ज पकडले होते.
    गुन्ह्यात ललित पाटीलचा सहभाग
    त्यानंतर गुन्ह्यात ललित पाटीलचा सहभाग समोर आले. परंतु, तो ससूनमधून पळाला. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान, तपासात पोलिसांना तपास करीत विनयचा वाहन चालक दत्ता डोकेला पळून जाण्यात मदत केल्याने अटक केली. तर, पैसेही पुरवले. विनय याच्या सांगण्यावरून ही मदत झाली असे समोर आले.
    उपचारानिमित्त ससून रुग्णालयात दाखल
    त्यानंतर पोलिसांनी विनयला या गुन्ह्यात ताब्यात घेतले. तत्पूर्वी विनय हा ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयिन कोठडीत होता. यानंतर तो उपचारानिमित्त ससून रुग्णालयात दाखल झाला होता. विनय व ललित दोघेही एकाच वॉर्डात होते. तेथे त्यांची ओळख झाली. त्यानंतर हे सर्व घडले. त्यामुळे विनय याच्याकडे तपास करण्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
    दरम्यान, विनय याने मध्यभागात असलेल्या त्याचा फ्लॅट ललित पाटील याला त्या मैत्रिणीला भेटण्यासाठी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तो 30 ऑक्टोबर रोजी तो त्या मैत्रिणीसोबत तेथे काही तासासाठी राहिला. त्यामुळे आता ललित ससून रुग्णालयातून त्या फ्लॅट कसा गेला, त्याला कोणी सोडले व विनय याने कैदी असताना त्याला फ्लॅट का दिला, असा प्रश्न यांना यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.