टांझानीयन देशातील अमली पदार्थ तस्काराला ठोकल्या बेड्या, गुन्हे शाखेच्या पथकाची करावाई; तब्बल साडे सात लाखांचा अमली पदार्थ जप्त

टांझानीयन देशातील एका अमली पदार्थ तस्काराला व त्याच्या साथीदाराला गुन्हे (Crime) शाखेच्या पथकाने बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल साडे सात लाखांचा (7 Lakh) अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा अमली पदार्थ तस्करी करत असल्याचे समोर आले आहे.

  पुणे : टांझानीयन देशातील एका अमली पदार्थ तस्काराला व त्याच्या साथीदाराला गुन्हे (Crime) शाखेच्या पथकाने बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल साडे सात लाखांचा (7 Lakh) अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा अमली पदार्थ तस्करी करत असल्याचे समोर आले आहे.

  बेका हमीस फॉऊमी (वय ४६, रा. कोंढवा खुर्द, मुळ. टांझानीयन देश) व अरशद अहमद इकबाल खान (वय ४२) अशी अटक केलेल्या या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेका फॉऊमी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. तो गेल्या काही वर्षांपासून पुण्यात आहे. अमली पदार्थ प्रकरणी त्याच्यावर यापुर्वी कारवाई देखील केली होती. याप्रकरणातून तो नुकताच जामीनावर बाहेर आला. त्यानंतर पुन्हा त्याने अमली पदार्थ तस्करी सुरू केली.

  ड्रग्जविरोधात कडक कारवाई

  दरम्यान, वाढत्या ड्रग्ज प्रकरणावरून नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ड्रग्जविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत. गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक तस्करांची माहिती काढत होते.

  ३१ ग्रॅम २६० मिलीग्रॅम कोकेन जप्त

  यादरम्यान, माहिती मिळाली की, बेका हा जामीनावर सुटला असून, तो कोंढवा खुर्द येथील साईबाबा नगरमधील सिग्नेचर सोसायटीच्या समोर रस्त्यावर अमली पदार्थ विक्री करत आहेत. त्यानूसार, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत साथीदार अरशदलाही पकडण्यात आले. त्यांची झडती घेतल्यानतंर त्याच्याकडून ३१ ग्रॅम २६० मिलीग्रॅम कोकेन जप्त केले. या कोकेनची किंमत साडे सात लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.