
त्यानुसार मुंबईच्या गुन्हे शाखेचे पथकाकडून सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसी येथे छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित कंपनी सील करून, येथून जवळपास १६ कोटी किमतीचे आठ किलो एमडी ड्रग्स जप्त केला आहे.
इफेड्रीन ड्रग्सचा पर्दाफाश
सोलापूर येथील कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे २०१६ साली सोलापुरातील याच चिंचोळी एमआयडीसी परिसरातील अवोन लाईफ साईन्सेस नावाच्या कंपनीत अशाच पद्धतीने ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत इफेड्रीन ड्रग्सचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी देखील तब्बल १८ हजार ६२३ किलो ड्रग्स ठाणे गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा अशीच कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्सवर कारवाई
मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्सवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांत मोठ्याप्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिकमधून ३०० कोटींहून अधिकचे ड्रग्स जप्त केले होते. तर, त्यानंतर नाशिक पोलिसांनी देखील ड्रग्ज संदर्भातली मोठी कारवाई केली होती. यावेळी नाशिक पोलिसांनी ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल जप्त केला होता.
मुंबई, नाशिक पाठोपाठ साेलापूर
यापूर्वी मुंबईत अशा कारवाई झाल्याच्या पाहायला मिळायच्या. मात्र. आता मुंबई, नाशिक पाठोपाठ सोलापूरातही ड्रग्सचा गोरख धंदा सुरु असल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेकडून सोलापुरात एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
चिंचोळी एमआयडीसीत कारवाई
सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसीतील एका बंद पडलेल्या कंपनीतून ड्रग्सचा गोरख धंदा चालत होता. विशेष म्हणजे यापूर्वी देखील याच चिंचोली अशीच कारवाई करण्यात आली होती. सुमारे दोन हजार कोटींची इफेड्रीन पावडरचा गोदामामध्ये बेकायदा साठा करून ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती. एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीच्या गोदामात छापेमारी करून ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी कंपनीच्या गोदामातून सुमारे १८ हजार ६२७ किलो ६०० ग्रॅम इफेड्रीन व सुडो इफेड्रीन पावडर जप्त करण्यात आला होती.