घरगुती वादातून भावानेच केला भावावर वार

दोन सख्या भावांमध्ये घरगुती कारणावरून भांडण सुरू असताना लहान भावाच्या मित्राने मोठ्या भावावर सुरीने वार केले. तर लहान भावाने फळीने मारून मोठ्या भावास जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.३) सायंकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.

    पिंपरी : दोन सख्या भावांमध्ये घरगुती कारणावरून भांडण सुरू असताना लहान भावाच्या मित्राने मोठ्या भावावर सुरीने वार केले. तर लहान भावाने फळीने मारून मोठ्या भावास जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.३) सायंकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.

    अजय रवींद्र तरकसे (वय २१, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. बीड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय रवींद्र तरकसे (वय १९, रा. खराबवाडी, ता. खेड), विवेक अंगद मिसाळ (वय २०, रा. खराबवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.