अब्दुल सत्तारांमुळे शिंदे सरकार सातत्यानं येतंय अडचणीत, तरीही का मिळतंय सत्तारांना अभय? कारण…

वादग्रस्त वक्तव्य आणि जमीन घोटाळा यामुळं पुन्हा एकदा सत्तार अडचणीत सापडले आहे, परंतु वारंवार सत्तार वेगवेगळ्या कारणांवरुन अडचणीत येत असताना आणि अब्दुल सत्तारांमुळे शिंदे सरकार सातत्यानं येतंय अडचणीत येत असताना, तरीही सत्तारांना अभय का दिला जात आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

    नागपूर– हिवाळी अधिवेशनात जसे अनेक मुद्दे गाजत आहेत, तसे मंत्र्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार यामुळं मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. मागील महिन्यात सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह विधानाबद्दल मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत आले होते. यावेळी सत्तारांच्या विरोधात राज्यभर आंदोलन, मोर्चे काढण्यात आले होते. हा वाद शांत होतो न होतो तोच अब्दुल सत्तार एका नव्या प्रकरणात अडकले आहेत. वाशीम जिल्ह्यातील १५० कोटी रुपये किमतीची गायरान जमीन एका खासगी व्यक्तीला बेकायदा बहाल केल्याचा आरोप मंत्री असताना अब्दुल सत्तार यांच्यावर केला जात आहे, त्यामुळं सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले असून, यावरुन विरोधकांनी कामकाज रोखून धरले होते. तर महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंगळवारी सत्तार यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर अनोखे आंदोलन केले. ‘शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान’, ‘खोके लुटा, कधी गायरान लुटा’, ‘भूखंड घ्या, कुणी गायरान घ्या’, ‘भूखंडाचे श्रीखंड खाणारे राजीनामा द्या’ अशा घोषणा देत सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले.

    दुसरीकडे त्यांच्या मुलीच्या टीईटी घोटाळ्याप्रकरणात टीईटी प्रमाणपत्र नसताना अब्दुल सत्तार यांच्या मुलीला सेवेत कायम कसे केले? असा सवाल उपस्थित केला जात आहे, हिना कौसर यांचे टीईटी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड आल्याने मविआ सरकारमध्ये मंत्री सत्तार अडचणीत आले होते. त्यानंतर आता पुन्हा वादग्रस्त वक्तव्य आणि जमीन घोटाळा यामुळं पुन्हा एकदा सत्तार अडचणीत सापडले आहे, परंतु वारंवार सत्तार वेगवेगळ्या कारणांवरुन अडचणीत येत असताना आणि अब्दुल सत्तारांमुळे शिंदे सरकार सातत्यानं येतंय अडचणीत येत असताना, तरीही सत्तारांना अभय का दिला जात आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

    दरम्यान, मंत्री सत्तार वारंवार स्वत: आणि शिंदे सरकारला अडचणीत आणत आहेत, तरीसुद्धा त्यांची पाठराखण का केली जातेय? असं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचे असल्यानं त्यांना सातत्यानं अभय देण्यात येतंय का? तसेच एकनाथ शिंदे यांचे अगदी जवळचे निकटवर्तीय समजले जातात, तसेच शिंदेंच्या बंडात सत्तारांचा मोठा सहभाग असल्याचं मानण्यात येतंय. त्यामुळेच त्यांना मंत्रिपदही मिळालं असं देखील बोललं जात आहे. मात्र सत्तार वारंवार अडचणीत येत असताना, त्यांना का वाचवलं जातंय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.