बुलढाणा तालुक्यात नागरिकांना भगर खाल्याने झाली विषबाधा

एकादशी असल्याने अनेक लोकांनी उपवास व्रत ठेवले होते. ग्रामीण भागातील काही लोकांनी उपवास असल्यामुळे भगर खाल्ली. परंतु काही वेळानंतरच अनेकांना उलटी, डोकेदुखी, चक्‍कर येणं सुरु झाले. काहींना वाटले की, ॲसिडीटीमुळे हे सर्व होत आहे.

    बुलढाणा : एकादशी (Ekadashi) असल्‍याने उपवासाची भगर (Bhagar) खाल्याने तालुक्यातील दोन गावातील जवळपास १५ ते २० लोकांना विषबाधा (poisoning) झाली. त्यांना शहरातील विविध खासगी दवाखान्यात (Private hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एकादशी असल्याने अनेक लोकांनी उपवास व्रत ठेवले होते. ग्रामीण भागातील काही लोकांनी उपवास असल्यामुळे भगर खाल्ली. परंतु काही वेळानंतरच अनेकांना उलटी, डोकेदुखी, चक्‍कर येणं सुरु झाले. काहींना वाटले की, ॲसिडीटीमुळे हे सर्व होत आहे.

    परंतु तब्येत अधिक बिघडताच त्यांना चिखलीमधील वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे..ज्या लोकांना भगरचे पीठ खाल्ल्याने त्रास झाला आहे.त्या सर्वांनी आपल्या गावातीलच दुकानातून भगर विकत घेतले होते. स्थानिक दुकानदारांनी तो माल चिखलीमधून घेतल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले आहे. सध्या विषबाधा झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.