Due to heavy rains in Sahoor area, flood crisis again on farmers, how to live now? The question of farmers

आष्टी तालुक्यासह (Ashti Taluka) साहूर परिसरामध्ये (Sahoor area) २३ जुलै रोजी संततधार मुसळधार पावसाने थैमान घातले होते. यात शेतक-यांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फोडून शेतातील उभ्या पिकांसह मातीदेखील खरडून गेली आहे.

  साहूर : २३ जुलै रोजी साहूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाने (With heavy rain) महापूर (Flood) येऊन शेतकऱ्यांचे नुकसान केले. ती धग शमतेनं शमते पुन्हा रात्रीपासून मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून, होतं नव्हत पीकही पुन्हा आलेल्या महापुराने पावसाने वाहून गेले आहे.

  आष्टी तालुक्यासह (Ashti Taluka) साहूर परिसरामध्ये (Sahoor area) २३ जुलै रोजी संततधार मुसळधार पावसाने थैमान घातले होते. यात शेतक-यांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फोडून शेतातील उभ्या पिकांसह मातीदेखील खरडून गेली आहे. या नुकसानीची पाहणी नेते पुढाऱ्यांसह तहसीलदार व संबंधित यंत्रणेने केली. तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा, यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला साकडे घातले असताना त्यावर शासनाचा निर्णय येण्या अगोदरच पुन्हा परिसरामध्ये दमदार मुसळधार पावसाने थैमान घालून उरल सुरल वाहून नेल्याचा प्रकार डोळ्यादेखत घडला. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी धास्तावला असून, प्रपंचाचा गाडा वर्षभर कसा चालवावा, हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

  आता जगावं कस

  मायबाप सरकार तुम्ही तरी पाठ फिरवू नका… होतं नव्हतं सारं गेलं… कधी पुरान तर कधी पावसाच्या मारान, आता जगावं कसं ते तरी सांगा..असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

  नदीच्या पुरात शेती गेली वाहून

  काल रात्रीपासून झालेल्या संततधार मुसळधार पावसामुळे पुन्हा येथील जाम नदीला (Jam River) आलेल्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नदीच्या दुथडी असलेल्या शेती पाण्याने वाहून गेल्या आहे. प्रचंड नुकसान दोन आठवड्यात दुसऱ्यांदा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.