Due to rain in Gondia, traffic on as many as 41 routes was blocked, heavy rain was recorded in all 8 talukas

जिल्ह्यातील नद्या दुथळीभरून वाहू लागल्या आहेत. आज बुधवारी सकाळच्या सुमारास जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील अनेक मार्गांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. सतर्कतेचा इशारा (Warning alert) म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

  गोंदिया : मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारपर्यंत जराशीही उसंत घेतली नाही. रात्री बरसलेल्या दमदार पावसामुळे जिल्हा जलमग्न झाला. नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागले. जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक पुरामुळे ठप्प (Traffic blocked due to flood) झाली आहे. तर ठिकठिकाणच्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची पंचाईत झाली. सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. प्रशासन देखील अॅक्शन मोडवर आले असून, सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. ठिकठिकाणी सुरक्षा पथक तैनात (Security team deployed) करण्यात आले आहेत.

  जुलै महिन्यात चार ते पाच दिवस संततधार पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने उघाड दिला. अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांपासून दिवसा ऊन तापत होते. प्रचंड उष्णता वाढली होती. वाढत्या उष्णतेबरोबर रोगराईचे प्रमाण देखील वाढू लागले होते. त्याचबरोबर बांधातील पाणी सुकल्यामुळे जमिनीला भेगा पडल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंतातूर (Farmers are worried) झाले होते. त्यातच हवामान खात्याने दिलेला पावसाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. एकदा झालेली पावसाची सुरुवात आज बुधवारपर्यंत कायम आहे.

  मंगळवारी सायंकाळपासून खऱ्या अर्थाने दमदार पाऊस बरसला. त्याआधी गोरेगाव, देवरी आणि इतर तालुक्यांत पाऊस झाला होता. सततच्या पावसामुळे नदी आणि नाल्यांतील पाण्याचा साठा कमालीचा वाढला. जिल्ह्यातील नद्या दुथळीभरून वाहू लागल्या आहेत. आज बुधवारी सकाळच्या सुमारास जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील अनेक मार्गांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. सतर्कतेचा इशारा (Warning alert) म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर (The district administration announced holiday for schools) केली.

  जिल्ह्यातील आठही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद (Heavy rainfall recorded all eight taluka) करण्यात आली. गोंदिया शहरातील संजय नगर, गौरीनगर, सेलटॅक्स कॉलोनी, गजानन कॉलोनी, तिरोडा शहर, देवरी, खमारी, चिखली, धादरी या गावांसह अनेक गावांत पाणी शिरले. शहरातील गौरीनगर येथील दोन घरे जमीनदोस्त झाली. पांगोली नदीवरील( Pangoli River) छोटा गोंदिया येथील नवीन पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक देखील बंद झाली.

  ४१ मार्गांवरील वाहतूक बंद

  आज बुधवारी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ४१ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. आमगाव तालुक्यातील ११ मार्गांमध्ये  गाटटेमनी ते ढुडवा, पदमपूर ते सावंगी, ढिवरटोला ते साखरीटोला, चिचटोला ते झालिया, ठाणा ते मानेगाव, बोथली ते लकडकोट, भोसा ते करंजी, सुपलीपार ते मोहगाव, गोंदिया ते आमगाव, आसोली ते साखरीटोला, कालीमाटी ते सुपलीपार.

  गोरेगाव तालुक्यातील १० मार्गांमध्ये मुंडीपार ते कमरगाव, मोहाडी ते कुऱ्हाडी, गोरेगाव ते कुऱ्हाडी, गोरेगाव ते झांजिया, बोटे ते म्हसगाव, हिरडामाली ते मोहगाव, सोनगाव ते बोरगाव. कवलेवाडा ते गोंदिया, बोरगाव ते कुऱ्हाडी, हिरापूर ते कुऱ्हाडी.

  सडक अर्जुनी तालुक्यातील ४ रस्त्यांमध्ये खाडीपार ते पाटेकुर्रा, घटेगाव ते गिरोला, चाकोरी ते घाटबोरी, सिंदीपार कोदामेडी. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सायगाव ते इळदा.

  तिरोडा तालुक्यातील धादरी ते उमरी, चुरडी ते गराडा, सालेबर्डी ते सोनुली, सरांडी ते मुंडिकोटा, गराडा ते मेंढा, पोटगाव ते विहीरगाव. सालेकसा तालुक्यातील लटोरी ते नवेगाव, सालेकसा ते देवरी, तिरखेडी ते साखरीटोला, चांदसुरज ते दरेकसा, नान्हवा ते घोन्सी

  गोंदिया तालुक्यातील गोंदिया ते तिरोडा आणि देवरी तालुक्यातील वडेकसा ते ककोडी, डवकी ते सिलापूर, सिलापूर ते फुक्कीमेटा या मार्गांवरील वाहतूक पुरामुळे बंद आहे.