नवी मुंबईत पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहनांची कसरत, चालक संतप्त

ट्रक चालकांमध्ये पेट्रोल, डिझेल वाहून नेणारे ट्रक चालक सहभागी झाल्याने, पेट्रोल पंपावर होणारा डिझेल पेट्रोलचा साठा संपुष्टात आला आहे.

    नवी मुंबई : सध्या देशभरात केंद्र सरकारने ट्रक चालकांसाठी केलेल्या कायद्याने ट्रक चालक संतप्त झाले आहेत. त्याचा परिणाम सर्व बाजारपेठांवर जाणवू लागला आहे. विविध वस्तू घेऊन येणारे ट्रक चालक संप करत असल्याने कारखानदार, पुरवठादार, व्यापारी तसेच ग्राहक सर्वच हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे या ट्रक चालकांमध्ये पेट्रोल, डिझेल वाहून नेणारे ट्रक चालक सहभागी झाल्याने, पेट्रोल पंपावर होणारा डिझेल पेट्रोलचा साठा संपुष्टात आला आहे.

    त्याचे परिणाम नवी मुंबईत पाहायला मिळाले. अनेक पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल डिझेल संपल्याने पंप बंद असल्याचे फलक लावलेले पाहायला मिळाले. त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहण्यास मिळाल्या. त्यामुळे नोकरीनिमित्त जाणारे नागरिक पेट्रोल, डिझेलविना अडकून पडलेले पाहण्यास मिळाले. अनेकजण त्यांचा राग व्यक्त करताना दिसले. त्यामुळे या संपावर तोडगा निघणार की नाही असा प्रश्न आता नागरीक विचारू लागले आहेत.

    नवी मुंबईतील पेट्रोल पंप फुल व काही रिकामे इंधन वाहू चालकांनी घेतलेल्या संपाच्या निर्णयाने अनेक पेट्रोल पंप वर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली व काही पेट्रोल पंपावर इंधन संपले असल्याचे फलक पाहायला मिळाले.