
आचार्य अत्रे यांच्या नावाने पुरस्कार मिळतो, याचा अभिमान आहे. त्यामुळे जबाबदारीही वाढली आहे. मुळशी पॅटर्न चित्रपट पुरंदरच्या शेतकऱ्यांनी पहिला व माझा सातकर केला. आपली जमीन विकण्याचा विचार सोडून दिला हे माझे भाग्य आहे. आपल्या माणसाकडून पुरस्कार मिळणे महत्वाचे आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.
सासवड : आचार्य अत्रे यांच्या नावाने पुरस्कार मिळतो, याचा अभिमान आहे. त्यामुळे जबाबदारीही वाढली आहे. मुळशी पॅटर्न चित्रपट पुरंदरच्या शेतकऱ्यांनी पहिला व माझा सातकर केला. आपली जमीन विकण्याचा विचार सोडून दिला हे माझे भाग्य आहे. आपल्या माणसाकडून पुरस्कार मिळणे महत्वाचे आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.
आचार्य अत्रे यांचा ५३ व्य स्मृतिदिनानिमित्त आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या वतीने आचार्य अत्रे पुरस्कार वितरण समारंभ उतसाहत संपन्न झाला. सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमात प्रा. यशवंत पाटणे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, श्रीराम पवार यांना आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार व प्रवीण तरडे यांना आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना तरडे बोलत होते.
प्रचंडपण हे आचार्य अत्रे यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने ऊर्जा मिळाली, असे प्रा. यशवंत पाटणे यांनी सांगितले. महापुरुषांची आठवण त्यांच्या मृत्यू नंतर किती दिवस येते हे त्यांचे वय मोजण्याचे साधन आहे. आचार्य अत्रे यांचे ५३ व्या स्मृतिदिन निमित्त आठवण होते.
प्रा. डॉ. यशवंत पाटणे, जेष्ठ लेखक.
अत्रे यांच्या पत्रकारितेची आठवण येते
आचार्य अत्रेंनी पंडित नेहरूंवर टीका केली, पण त्यांच्या मृत्यू नंतर लिहिलेले अग्रलेख अप्रतिम होते. आज गुळगुळीत पानावरील गुळगुळीत मजकुराची पत्रकारिता पाहून आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेची आठवण येते, असे विचार श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राला आचार्य अत्रे यांची आठवण राहिली नाही, मात्र सासवड येथे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आचार्य अत्रे यांची आठवण ठेवली जात आहे. आचार्य अत्रे यांनी पत्रकारिता केली ते उत्तम शिक्षक होते, राजकारणी होते, नाटककार सिनेमा निर्माते होते. आपल्या पहिल्या वाक्यात सभा जिकंण्याचे कसब त्यांच्याकडे होते.
-उल्हास पवार, जेष्ठ विचारवंत.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी आ. अशोक टेकवडे यांनी मनोगत व्यक्त केले. साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ऍड. अण्णासाहेब खाडे, रमेश आव्हाने, शांताराम पोमण, डॉ. राजेश दळवी यांनी स्वागत केले. कार्यक्रमास नियामक मंडळाचे सदस्य खाजा बागवान, शशिकला कोलते, गौरव कोलते, प्रदीप पोमण, बाबूसाहेब माहूरकर, दत्ता चव्हाण, दिलीप निरगुडे, कुंडलिक मेमाणे, नंदकुमार सागर आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव बंडूकाका जगताप यांनी मानपत्र वाचन केले. संतोष काकडे यांनी आभार मानले. सचिन घोलप यांनी सूत्रसंचालन केले. दादा मुळीक राहुल जाधव, अक्षय पवार, शिवाजी घोगरे, शांताराम कोलते यांनी संयोजन केलं.