हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे ११ वासरांना मिळाले जीवदान

कत्तलखान्याकडे नेण्यात येणाऱ्या तब्बल ११ वासरांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. मसुचीवाडी ता. वाळवा येथे बेकायदेशीर तोंड बांधलेली वासरे व वाहतूक करणारी २ वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तर अमोल व संतोष भास्कर शिंदे (रा. बोरगाव.ता. वाळवा) या दोघां तरुणांना अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

  इस्लामपूर : कत्तलखान्याकडे नेण्यात येणाऱ्या तब्बल ११ वासरांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. मसुचीवाडी ता. वाळवा येथे बेकायदेशीर तोंड बांधलेली वासरे व वाहतूक करणारी २ वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तर अमोल व संतोष भास्कर शिंदे (रा. बोरगाव.ता. वाळवा) या दोघां तरुणांना अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

  याबाबत मिळालेली माहिती अशी, वडगाव येथे कत्तलखान्याकडे नेण्यासाठी काही वासरांना एकत्रितपणे केले आहे.ही सर्व वासरे मसुचीवाडी रस्त्यावरील शेड मध्ये कोंडून घातली असल्याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाली होती. रविवारी रात्री साडे नऊ वाजता तरुणांनी इस्लामपूर पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली.

  आक्रमक पवित्रा घेतलेल्या तरुणांनी पोलिसांच्या समक्ष मसुचीवाडी गावाकडे धाव घेतली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करताना शिंदे कुटुंबाच्या शेडचा दरवाजा उघडला. तेव्हा ९ गाईची वासरे व ३ म्हशीच्या पिल्ले तोंड बांधलेल्या अवस्थेत मिळून आली. पोलीस व काही तरुण रात्रीच्या वेळी अचानक आल्याने भांबावून गेलेल्या शिंदे यांच्या घरातील महिलांनी वासरे आम्ही पाळण्यासाठी आणली आहेत असे सांगितले. पोलिसांनी उलटतपासणी केल्यावर या वासरांना तोंडाला बांधून कत्तलखान्यात नेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी सर्व वासरे व वाहतुकीची बोलेरो जीप क्रमांक (एम एच १० बी आर ४७४२ व छोटा हत्ती क्रमांक (
  एम एच ११ ए जी ५२२४) जप्त करण्यात आली आहेत.

  मध्यरात्री सर्व वासरे पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहेत. ती गो-शाळेत पाठवण्यात येणार आहेत. तर दोघा अमोल व संतोष शिंदे बंधूंना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 प्रमाणे दोघा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतीक आप्पासाहेब ननावरे ( रा.नवी मुंबई ) यांनी फिर्याद दिली

  तरुणांच्या सतर्कतेमुळे वासरांना जीवदान..!

  कत्तलखान्याकडे जाणारी तब्बल ११ वासरे श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उरूण ईश्वरपूरचे दिगंबर कुटे, प्रतिक शिरसागर गणेश पाटील,अजित इंगळे,अविनाश जाधव, अभिमन्यू पाटील, शेखर खांडेकर, शुभम कुंभार व निशिकांत दादा युथ फौंडेशन उरूण ईश्वरपूरच्या पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचली.