vashi toll naka accident

वाशी टोल नाक्यावर (Vashi Toll Plaza) एका डम्परने जवळपास १० ते १२ वाहनांना मागून धडक दिली.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोघेजण या अपघातात जखमी झाले आहेत.

    नवी मुंबई: वाशी टोल नाक्यावर (Vashi Toll Plaza) एक भयानक अपघात झाला आहे. एका डम्परने जवळपास १० ते १२ वाहनांना मागून धडक दिली. टोल भरण्यासाठी ही वाहने रांगेत उभी होती. त्याचवेळी अचानक एक डम्पर (Dumper Accident) आला आणि त्याने रांगेत उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांना मागून धडक दिली. (Vashi Accident) सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. ही घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

    डम्परचे ब्रेक अचानक निकामी (Fail) झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident) झाला. टोल भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांना या भरधाव डम्परने धडक दिली.

    या धडकेत २ नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.