पंकजा मुंडेंचे भाषण अन् खा. उदयनराजे झाले भावनाविवश; नक्षत्राच्या उदघाटन कार्यक्रमात बहिण भावाच्या नात्यांचा असाही बंध

राजकारणातील रोखठोक व्यक्तिमत्व आणि हटके अंदाजासाठी प्रसिद्ध असणारे सातारचे खा. उदयनराजे भोसले नक्षत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात भावनाविवश झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या भाषणा दरम्यान खा. उदयनराजे भोसले यांच्या डोळ्यांमध्ये अचानक पाणी उभं राहिलं.

    सातारा : राजकारणातील रोखठोक व्यक्तिमत्व आणि हटके अंदाजासाठी प्रसिद्ध असणारे सातारचे खा. उदयनराजे भोसले नक्षत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात भावनाविवश झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या भाषणा दरम्यान खा. उदयनराजे भोसले यांच्या डोळ्यांमध्ये अचानक पाणी उभं राहिलं. भाषणाच्या वेळी ते उभे राहिले तेव्हाही एक मिनिटं थांबल्याने सारे सभागृह स्तब्ध झाले.
    पंकजा मुंडे यांनी नक्षत्र महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणामध्ये वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे खा. उदयनराजे प्रचंड भावूक झाले. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी खा. उदयनराजे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्या म्हणाल्या, एका छत्रपतीचे राजासारखे मन आणि भावाच्या नात्याने इतके प्रेम दिले. माझ्यासारख्या मुलीला बहीण मानलं हे काय कमी आहे का? पंकजा मुंडे आणि उदयनराजे बहिण भाऊ असावेत हेच छत्रपतींना अपेक्षित आहे आणि राजेंना सुध्दा हेच अपेक्षित आहे, असे स्पष्ट केले. पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या शिवशक्ती परिक्रमेला पहिल्याच दिवशी उदयनराजे यांच्या उपस्थितीमुळे एक वेगळी उंची मिळाली दिंवंगत मुंडे यांच्या स्मारकाच्या कार्यक्रमास खा. उदयनराजे उपस्थित राहिले. मंचावर भाषणाला उदयनराजे उभे राहिले असता तेही दोन मिनिटे स्तब्ध आणि शांत उभे राहिले आणि पुन्हा गहिवरले त्यामुळे सातारकर प्रेक्षक सुद्धा या स्नेहबंधामुळे भावनावश झाले.

    दुसऱ्या समाज अन्याय होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी
    जातीपातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि जातीपातीच्या भिंती बांधून त्यावर स्वतः ची सोय करणाऱ्यांनी बघावे असा टोलाही पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमात लगावला. मराठा समाजाला कसे आरक्षण मिळणार याची मला उत्सुकता आहे. एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाज अन्याय होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी, असेही मुंडे म्हणाल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे मात्र ते टिकणारे असावे असे त्या म्हणाल्या.