मुंबईच्या प्रदूषणात होतीये मोठी वाढ; आठ महिन्यांनंतरही धूळ शमन केंद्र कागदावरच

मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणाला (Air Pollution) रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. धूळ नियंत्रणासाठी मुंबईमध्ये पाच ठिकाणी धूळ नियंत्रण यंत्र बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला होता.

    मुंबई : मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणाला (Air Pollution) रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. धूळ नियंत्रणासाठी मुंबईमध्ये पाच ठिकाणी धूळ नियंत्रण यंत्र बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला होता.

    एप्रिल महिन्यात कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून, आठ महिने उलटले, तरी धूळ नियंत्रित यंत्रणा कागदावरच आहे. त्यामुळे प्रदूषणाबाबत मुंबई महापालिका गंभीर आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही वर्षांपासून मुंबईतील हवा दूषित होत चालली आहे आणि त्याचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने वाहतूक कोंडी होणाऱ्या पाच जागा निश्चित, मात्र यंत्रणाच बसवली नाही.

    मुंबईतील एलबीएस जंक्शन, छेडा नगर, बीकेसी कलानगर जंक्शन, दहिसर चेकनाका आणि हाजीअली येथील पाच ठिकाणी ही यंत्रणा बसवली जाणार होती. परंतु हाजीअली येथे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने यंत्रणा बसवलेली असल्याने ही जागा बदलून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील ट्रॉमा केअर रुग्णालय येथील चौकात ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    जागा निश्चित होऊनही ही यंत्रणा अद्यापही बसवण्यात आलेली नाही. या ठिकाणी खुल्या हवेतील धूळ शमन केंद्र आणि धूळ नियंत्रण प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आठ महिने उलटले तरीही केंद्र झाले नाही.