‘उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय’; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांच्या बाबत मी काही बोलणार नाही असा पलटवार केला आहे.

    नाशिक : मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांच्या बाबत मी काही बोलणार नाही असा पलटवार केला आहे.

    मुंबईत पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गोळीबाराच्या घटनेवरून महाराष्ट्राल फडतूस व मनोरूग्ण गृहमंत्री लाभल्याची टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना नाशिक येथे दौऱ्यावर आलेले देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांची भाषा व शब्द पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे माझे ठाम मत झाले आहे. त्यामुळे अन्य काही प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करेल की उद्धवजी ‘गेट वेल सून’ अशी टीका फडणवीस यांनी केली.

    ज्या काही घडलेल्या गोष्टी आहेत. त्या घटनांचा राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेशी संबंध जोडणे अयोग्य होईल. ज्या काही दोन तीन घटना घडल्या आहेत. त्यामागे व्यक्तीगत कारणे आहेत. मात्र त्याची दखल घेण्यात आली असून, योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी फडणवीस यांनी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टिवार यांच्यावरही टीका केली.