अमृता फडणवीस लाचप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोठं विधान; म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटीची (One Crore Bribe) लाच देण्याची ऑफर देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटीची (One Crore Bribe) लाच देण्याची ऑफर देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अमृता फडणवीस यांनीच मलबार हिल पोलीस (Malbar Hill Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मला अडचणीत आणण्यासाठी हा ट्रॅप होता. अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही कामे करण्यासाठी प्रयत्न झाला आहे. पहिल्यांदा पैशांची ऑफर देण्यात आली. त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनिल जयसिंगानी नावाचा एक व्यक्ती आहे. जो गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार आहे. त्या व्यक्तिवर 14 ते 15 गुन्हे आहेत. अनिल जयसिंगानी यांची एक मुलगी आहे. ही मुलगी 2015-16 च्या दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटली होती. त्यानंतर तिचे भेटणे बंद झाले होते. मात्र, अचानक पुन्हा 2021 नंतर या मुलीने माझी पत्नी अमृता फडणवीस यांना भेटायला सुरु केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

डिझायनर असल्याचे म्हटले…

अनिल जयसिंगानी यांच्या मुलीने मी डिझायनर आहे, माझा व्यवसाय सुरु असल्याचे सांगितले. प्रभावशाली 50 महिल्यांच्या यादीत माझं नाव आल्याचे त्या मुलीने सांगितले. तसेच आईवर लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन देखील त्या मुलीने अमृता फडणवीस यांच्याकडून करुन घेतले. असे करून तिने विश्वास संपादन केला होता.

मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

त्या मुलीने दिलेल्या हिंटप्रमाणे असे दिसते की मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यापूर्वीही मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.