भल्या पहाटे स्काॅर्पिओ नाल्यात काेसळली; चाैघे जखमी

भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ वाहनाचा ताबा सुटल्याने चार चाकी वाहन थेट नाल्यात कोसळले यात चालक गंभीर जखमी झाला. इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने पुढील अनर्थ टळला अपघातात जखमी झालेले तीन विद्यार्थी हे एका नामांकित कॉलेजचे असल्याचे समजते.

    सिडको : भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ वाहनाचा ताबा सुटल्याने चार चाकी वाहन थेट नाल्यात कोसळले यात चालक गंभीर जखमी झाला. इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने पुढील अनर्थ टळला अपघातात जखमी झालेले तीन विद्यार्थी हे एका नामांकित कॉलेजचे असल्याचे समजते. या अपघातात चार चाकी वाहनाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्कार्पिओ वाहनाचे चालक निशांत श्रीवास्तव (२५ रा संजीव नगर अंबड) हे आपल्या ताब्यातील स्कार्पिओ वाहन (एमएच १५ ईबी ६९५०)ने आज (दि. २३) पहाटे पाच वाजेच्या सुमारास माऊली लॉन्स परिसरातून जात असताना रस्त्यावरील वळण लक्षात न आल्याने त्यांचा चार चाकी वाहनाचा ताबा सुटल्याने वाहन थेट नाल्यात कोसळले. यात चालक निशांत श्रीवास्तव गंभीर जखमी झाले व वाहनात असलेले इतर चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नाल्यात कोसळलेल्या स्कार्पिओ वाहनाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.