संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. दरम्यान, वातावरणातील वाऱ्याची खंडितता या प्रणालीमुळे सध्या राज्यात ठिकठिकाणी गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस होत आहे. तसेच राज्यात आगामी काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असं हवामान विभागाने (Meteorological Department) म्हटलं आहे.

    ठाणे – सध्या तापमानात (summer) प्रचंड वाढ झाल्यामुळं अंगाची लाही लाही होत आहे. वातावरणातील उष्णता यामुळं सगळेच हैराण झाले आहेत. कधी एकदा पाऊस पडतोय, असं सर्वांना झालंय. दरम्यान, मान्सून अजून एक आठवड्यावर असताना, काल मुंबई व उपनगरात आज पहाटे पावसाने हजेरी लावली. भल्या पहाटे सकाळी मुंबईसह पश्चिम उपनगरात व पूर्व उपनगरात पावसामुळं वातावरणार गारवा निर्माण झाला. त्यामुळं गरमी व उष्णतेमुळं हैराण झालेल्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. दरम्यान, वातावरणातील वाऱ्याची खंडितता या प्रणालीमुळे सध्या राज्यात ठिकठिकाणी गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस होत आहे. तसेच राज्यात आगामी काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असं हवामान विभागाने (Meteorological Department) म्हटलं आहे.

    कुठे कुठे पावसाची हजेरी…

    दरम्यान, शुक्रवारी सकाळी पश्चिम उपनगरात म्हणजे विरार, नालासोपारा, अंबरनाथ, बदलापूर, विरारमध्ये अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. आज पहाटे 5 च्या सुमारास पावसाची हजेरी लावली. हलक्या पावसाच्या सरी बदलापूर, अंबरनाथ, वसई, विरार, नालासोपाऱ्यात पडल्या. या पावसामुळे शहरात जरी गारवा निर्माण झाला असला तरी ग्रामीण भागात मात्र पिकांचे नुकसान केले आहे. तसेच या पावसामुळं गरमीमुळं हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे.